शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘वाहन घसरले तरी तो अपघातच; महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई द्या’; उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:24 IST

मोटार वाहन कायद्यात अपघाताची व्याख्या परिभाषित केलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दुसऱ्या वाहनाची धडक लागल्यावरच अपघात ठरत नाही, तर वाहन घसरल्यासही तो अपघात ठरतो. त्यामुळे अशा अपघातातील पीडितही मोटार वाहन कायद्यांतर्गत नुकसानभरपाईस पात्र आहेत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने मृत महिलेच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला देताना नोंदविले.

मोटार वाहन कायद्यात अपघाताची व्याख्या परिभाषित केलेली नाही. व्यक्तीला अचानक इजा पोहोचवणारी घटना, असा उल्लेख करण्यात आला आहे, असे म्हणत न्या. शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठाने एका महिलेच्या नातेवाईकांना ७ लाख ८२ हजार ८०० रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले. संबंधित महिलेची साडी मोटारसायकलच्या चाकात अडकल्याने मोटारसायकल रस्त्यावर घसरली आणि त्या अपघातात तिचा मृत्यू झाला.

नुकसानभरपाईसाठी महिलेच्या पतीने मोटार वाहन अपघात लवादात अर्ज केला. मात्र, लवादाने त्यांची मागणी फेटाळली. अर्जानुसार, पती, पत्नी आणि त्यांची अल्पवयीन मुले दुचाकीवरून प्रवास करत होती. ऐनवेळी पत्नीची साडी मोटारसायकलच्या पाठच्या चाकात अडकली आणि मोटारसायकल घसरली. यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिला मृत घोषित करण्यात आले हाेते.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट