शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लोकसभेला फटका, तरी थांबेना कांद्याचा खेळखंडोबा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 08:08 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा पिकाने सत्ताधारी भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचा वांदा केल्यानंतरही केंद्र सरकारकडून कांद्याचा खेळखंडोबा सुरूच आहे.

योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक: एखाद्या शेतमालाचे, त्याचे उत्पादन ए घेणाऱ्या शेतकऱ्यांचे, त्याचा व्यापार करणाऱ्या व्यावसायिक, निर्यातदारांचे कसे वाटोळे करायचे, याचे गेल्या १० वर्षातील कांदा हे पीक दुर्दैवाने आदर्श उदाहरण ठरले आहे. केंद्र सरकारच्या धोरण लकव्याचा सर्वाधिक फटका कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. कधी काळी नगदी पीक असलेला कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यातून सातत्याने पाणी काढत आहे.

आता केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कांदा खरेदी करताना त्याचे दर ठरविण्याचे नाफेड (राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ) व एनसीसीएफ (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) यांचे अधिकार काढून घेतले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयानेच २ जून रोजी प्रतिकिलोचा दर २१ रुपये ०५ पैसे निश्चित केला आहे. रोज दर ठरण्याऐवजी आता आठवड्धाचे दर केंद्रीय स्तरावरून ठरविले जातील. नाफेडच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपन्या कांदा खरेदी करत आहेत. सरकारी खरेदीत विळा लागलेला कांदा चालत नाही, कांद्याचे टरफल निघालेले नको, अशा भरमसाठ अटी असतात.  म्हणजे थोडक्यात निर्यातक्षम कांदा लागतो. मात्र निर्यातक्षम कांद्याला बाजार समितीत क्विंटलमागे २,७०० रुपयांपर्यंत दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली आहे.

सरकारी कांदा खरेदी केवळ १० टक्के

भाव स्थिरीकरण निधीतून नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून केंद्र सरकारने ५ लाख कांदा खरेदीचे लक्ष्य निर्धारित केले. ● मात्र या दोन्ही संस्थांच्या खरेदीत कोणतीही पारदर्शकता नाही. बाजार समितीत कांदा खरेदी होत नसल्याने खरेदीलाही मर्यादा आल्या आहेत.

महिनाभरात या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून केवळ १७ हजार टन कांद्याची खरेदी झाल्याचे समजते. ही १० टक्केही खरेदी नाही. त्याची अधिकृत आकडेवारी वेळोवेळी जाहीर होण्याची गरज आहे.

कोंडी फोडण्यासाठी

- कांद्याची सरकारी खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीत करावी. त्यामुळे स्पर्धा वाढेल आणि शेतकयांच्या कांद्याला चांगले दर मिळतील

- नाफेड व एनसीसीएफने ४ हजार रूपये क्चिटल दराने कांदा खरेदी करावी.

शेतकऱ्यांना परवडेनात २ जूनचे भाव

२ जूनला केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने क्विंटलमागे जाहीर केलेले २,१०५ रुपये भाव आता स्पर्धात्मक राहिलेले नाहीत.

१ जूनला लासलगाव बाजार समितीत कांद्याचे क्विंटलमागे जास्तीत जास्त दर २,१६८ रुपये होते, आता ते दर २,७८५ रुपये झाले आहेत.

त्यामुळे सरकारी खरेदीचे २,१०५ रुपये दर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. सरकारी दरापेक्षा चांगले दर बाजार समितीत मिळत आहेत.

टॅग्स :onionकांदा