शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतरही ‘एमपीएससी’चे अजून ठरेना, नवा परीक्षा पॅटर्न कधीपासून? विद्यार्थी संभ्रमात, पेच कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:42 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला पत्र लिहून नवा परीक्षा पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून अकरा दिवस उलटले तरी याबाबत एमपीएससीने निर्णय घेतलेला नाही.

दीपक भातुसे -

मुंबई :  स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या नव्या पॅटर्नबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावर अकरा दिवस लोटूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. 

नवा परीक्षा पॅटर्न २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा विरोध करत २०२५ सालापासून तो लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारी रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत त्याच दिवशी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैैठकीत याबाबत चर्चा झाली आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला पत्र लिहून नवा परीक्षा पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून अकरा दिवस उलटले तरी याबाबत एमपीएससीने निर्णय घेतलेला नाही.

विद्यार्थ्यांनी अभ्यास कोणत्या पॅटर्नचा करायचा? मुख्यमंत्र्यांनी ३१ जानेवारी रोजी विनंती केल्यानंतर नवा पॅटर्न २०२३ पासूनच लागू करावा, अशी मागणी करत ३ फेब्रुवारी रोजी पुण्यात काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे आता एमपीएससी नवा पॅटर्न २०२३ पासून लागू करणार की २०२५ पासून असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा संभ्रम असल्याने पुढील परीक्षेचा अभ्यास  कोणत्या परीक्षा पॅटर्नच्या आधारे करायचा याबाबत गोंधळाचे वातावरण आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी एमपीएससीने तातडीने याबाबत खुलासा करण्याची आवश्यकता असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.'

यूपीएससीच्या धर्तीवर बदल --  सध्या राज्य सेवा मुख्य परीक्षा ही बहुपर्यायी (ऑब्जेक्टिव्ह) आहे. एकूण ८०० गुणांपैकी केवळ १०० गुणांची वर्णनात्मक लेखी उत्तरे लिहावी लागतात. -  नव्या पॅटर्ननुसार मुख्य परीक्षा एकूण १,७५० गुणांची असेल आणि ही पूर्ण परीक्षा पूर्णपणे वर्णनात्मक लेखी स्वरूपाची असेल. -  राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती नागरी सेवा परीक्षेप्रमाणे (यूपीएससी) करण्यासाठी आयोगाने हा बदल केला आहे. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थी