अजित पवारांच्या सुचनेनंतरही सिंदखेडराजा येथील राजवाडा उघडलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 11:55 AM2021-02-18T11:55:26+5:302021-02-18T12:47:35+5:30

Ajit Pawar's Instruction not Followed लेखी आदेश नसल्याची सबब देऊन उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेला एक प्रकारे केराची टोपली दाखविली आहे.

Even after Ajit Pawar's suggestion, the palace at Sindkhedraja was not opened | अजित पवारांच्या सुचनेनंतरही सिंदखेडराजा येथील राजवाडा उघडलाच नाही

अजित पवारांच्या सुचनेनंतरही सिंदखेडराजा येथील राजवाडा उघडलाच नाही

googlenewsNext
ठळक मुद्देवरिष्ठांचे लेखी आदेश नसल्याची सबबपुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याचे घूमजावपर्यटकांचा हिरमोड होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : स्वराज्याची प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळ असलेला लखुजीराव जाधव यांचा राजवाडा कोरोना काळात बंद होता. दरम्यान, कोविडचे नियम शिथिल झाल्यानंतर राज्यातील अनेक गडकिल्ले खुले करण्यात आले. मात्र, राजवाडा आजही बंद असल्याने येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. (Ajit Pawar's Instruction not Followed)  
 राजवाडा उघडावा यासाठी नगराध्यक्ष सतीश तायडे यांनी मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यावर आजतागायत कोणतीच कार्यवाही झाली नाही. मंगळवारी सिंदखेडराजा विकास आराखड्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात एक उच्चस्तरीय बैठक झाली. याच बैठकीत नगराध्यक्ष तायडे यांनी राजवाडा उघडला जावा अशी आग्रही मागणी केली. याला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना राजवाडा बुधवारीच उघडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, बुधवारी दुपारपर्यंत राजवाडा उघडला गेला नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी आपल्याकडे वरिष्ठांचे लेखी आदेश नसल्याची सबब देऊन उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेला एक प्रकारे केराची टोपली दाखविली आहे. बैठकीत दिलेल्या शब्दावरून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याने घूमजाव केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  राजवाडा आता कधी उघडला जाईल याकडे सध्या लक्ष लागून आहे.

Web Title: Even after Ajit Pawar's suggestion, the palace at Sindkhedraja was not opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.