शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : निवडणुकीत नव्या पक्षाची एन्ट्री! नाव अन् चिन्ह ठरलं; संभाजीराजेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 11:38 IST

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी आणखी एका राजकीय पक्षाची निवडणूक आयोगात नोंदणी झाली आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) :  राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या आधी एका नवीन पक्षाची निवडणूक आयोगात नोंदणी झाली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी काही महिन्यापूर्वी स्वराज्य संघटनेची स्थापना केली होती. आता निवडणूक आयोगात पक्षाची अधिकृतरित्या नोंदणी केली आहे. "महाराष्ट्र स्वराज्य पक्ष" असं या पक्षाचे नाव असणार आहे. याबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. 

"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण

यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत आणखी एक पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात असणार आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पक्षामुळे अनेकांची गणित बिघडणार असल्याचे बोलले जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीआधी राज्यात तिसरी आघाडी सुरू झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू या नेत्यांनी एकत्र येत ही आघाडी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी यांचे गणित बिघडणार असल्याचे बोलले जात आहे. 

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची पोस्ट

आनंदवार्ता…! 

स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की,दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल.

याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे.

मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. 

महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित !जय स्वराज्य !

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीElectionनिवडणूक 2024