शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

नाशिकमध्ये उपक्रम : दर शनिवारी ‘दप्तराला’ सुटी

By admin | Updated: September 26, 2016 23:19 IST

ते शनिवारी खूप खूश असतात. दप्तर नाही की शाळेत अभ्यासाचा त्रास नाही, कुणी खेळतंय, तर कोणी वाचन करतंय, कोणी प्रयोग करतोय, तर कुणी विविध वस्तू हाताळतोय..

संजय पाठक

नाशिक,दि. २६ : ते शनिवारी खूप खूश असतात. दप्तर नाही की शाळेत अभ्यासाचा त्रास नाही, कुणी खेळतंय, तर कोणी वाचन करतंय, कोणी प्रयोग करतोय, तर कुणी विविध वस्तू हाताळतोय...शाळेत अशा प्रकारची मजा अनुभवणारी ही मुले आहेत महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळेतील ! गेल्या महिनभरापासून मंडळाने शनिवारी दप्तराला सुटी उपक्रम राबविला असून, पर्यायी ज्ञानाची साधने उपलब्ध करून दिल्याने मुलांचे शनिवारी शाळेत येण्याचे प्रमाण वाढले आहे.

राज्यात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शाळकरी विद्यार्थ्यांवर दप्तराच्या ओझ्याचा विषय गाजत आहे. वह्या-पुस्तकांचे जड ओझे वागवणारे विद्यार्थी मान आणि पाठेच्या विकारांमुळे त्रस्त आहे. जड दप्तर नेणे कोणालाही आवडत नाही. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने शाळांना दप्तराचे ओझे कमी करण्याच्या सूचना करतानाच अनेक शाळांमध्ये दप्तर तपासणीही केली. त्यामुळे आता शाळा विविध उपक्रम राबवित आहेत. त्याच धर्तीवर नाशिक महापालिका शिक्षण मंडळाने गेल्या महिनाभरापासून दप्तराला सुटीचा प्रयोग सुरू केला आहे. मनपा शिक्षण मंडळाच्या १२८ शाळेतील सुमारे ३२ हजार मुले त्यामुळे शनिवारी आनंददायी पद्धतीने ज्ञानार्जन करीत आहेत.

महापालिकेच्या शाळांमध्ये येताना दर शनिवारी दप्तराची सुटी दिल्यानंतर मुलांचा अभ्यास होत नाही असे नाही, तर त्यांना अन्य प्रकारचे शिक्षण दिले जाते. कला, खेळ आणि कार्यानुभव हे तीन विषय प्रामुख्याने शिकविले जातात. त्यामुळे मुले चित्रे काढतात, वेगवेगळे खेळ खेळतात शिवाय कार्यानुभवाच्या माध्यमातून विविध वस्तू दुरुस्त करणे आणि अन्य कामेही करतात. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षण मंडळाने मानधन, तासिकेवर शिक्षक नियक्त केले असून, तेच प्रामुख्याने हे विषय हाताळतात. भाषा आणि गणिताचे तासही होतात. परंतु तेही हसत खेळत! भाषेच्या तासाला अवांतर वाचन करून घेतले जाते. समजा, कोणत्याही विद्यार्थ्याला पाठ्यक्रमाचे पुस्तक लागलेच तर शाळेत तसे अतिरिक्त पुस्तके असल्याने अध्यापनात व्यत्यय येत नाही. गेल्या महिनाभरापासून हा उपक्रम सुरू असून, त्यामुळेच मुलांची शनिवार - रविवार अशी सलग सुटी घेण्याची मानसिकता कमी झाल्याचे शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले.मुलांचा सकारात्मक प्रतिसादमनपा शिक्षण मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमामुळे मुले समाधानी असून, अध्ययनात रस घेत आहेत. दफ्तर न आणता मुले शाळेत येतात आणि सर्वच उपक्रमात सहभागी होतात.