नागपूर : राज्यातील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली.पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कामधेनू दत्तक योजनेबाबत सदस्य प्रा. मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना राज्यमंत्री खोतकर म्हणाले, राज्यातील दूध उत्पादकता वाढावी, यासाठी कामधेनू दत्तक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. राज्यातील १३४११ गावांमध्ये ही योजना कार्यान्वित असून ४८७८ गावे शिल्लक आहेत. ज्या गावात ३०० पशुधन असेल त्या गावाची निवड या योजनेसाठी केली जाते.
डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 04:04 IST