शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार परिषद प्रकरण : क्लोन कॉपी देण्यास लागेल किमान सहा महिन्यांचा कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 16:32 IST

एल्गार परिषदेतील आरोपींनी आपल्याला क्लोन कॉपी मिळावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती.

ठळक मुद्देनऊपैकी केवळ दोन जणांना मिळाली क्लोन कॉपी

पुणे :  एल्गार परिषदेतील आरोपींनी आपल्याला क्लोन कॉपी मिळावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती. न्यायालयाने ती मान्य केली. मात्र प्रत्यक्षात या क्लोनिंगची कार्यपध्दती प्रचंड वेळखाऊ असून या खटल्यातील एकूण नऊ आरोपींपैकी केवळ दोन आरोपींनाच क्लोन कॉपी मिळाली आहे. उर्वरीत आरोपींना क्लोन कॉपी मिळण्याकरिता किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती एल्गार प्रकरणातील आरोपींचे वकील राहुल देशमुख यांनी दिली.  गुरुवारी एल्गार परिषद प्रकरणाची होती. यावेळी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. हजर केल्यानंतर न्यायालयाच्या परिसरातील एका हॉलमध्ये क्लोन कॉपीचे काम सुरु होते.  खटल्याशी संबंधित व्यक्ती व वकील यांनाच केवळ त्या हॉलमध्ये जाण्याची परवानगी असल्याचे सांगण्यात आले. याबाबत देशमुख यांना अधिक विचारले असता ते म्हणाले, एल्गार प्रकरणातील 9 आरोपींना आपल्याला क्लोन कॉपी मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार त्यांना क्लोन कॉपी देण्याचे काम सुरु झाले आहे.  या प्रकरणात एकूण 18 इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस आहेत. त्या प्रत्येक डिव्हाईसची क्लोन कॉपी  तयार होण्यास सहा तासांचा कालावधी लागतो. याप्रमाणे प्रत्येक डिव्हाईची कॉपी 9 आरोपींमध्ये देण्याकरिता लागणारा वेळ प्रचंड आहे. याकरिता न्यायालयाकडे आरोपींच्या जामिनाची मागणी करण्यात आली होती. जामिन मिळाल्यानंतर देखील क्लोनिंगची प्रक्रिया सुरु ठेवण्यास कुठलीही अडचण नव्हती.  त्यामुळे वेळेची उपलब्धता पाहिल्यास यापुढे सहा किंवा वर्षभराचा काळ क्लोनिंग प्रक्रियेकरिता खर्ची पडेल. असे देशमुख  यांनी सांगितले. एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी सध्या विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सुरू आहे. सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन , अरुण फरेरा, वर वरा राव, महेश राऊत, व्हार्नोन गोन्सालविस, सुधा भारद्वाज, रोना विल्सन यांना एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जामिनासाठी राहुल देशमुख, पार्थ शहा, सिद्धार्थ पाटील यांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

                          

 

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाArrestअटकCourtन्यायालय