शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आई मला तुझी फार काळजी वाटते... ; एल्गार प्रकरणातील आरोपींना जामीन देण्यासंबंधी विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 12:22 IST

एल्गार प्रकरणातील आरोपींना जामीन द्यावा शोमा सेन यांच्या मुलगी कोयल सेन यांची सरकारला विनंती

ठळक मुद्देकैद्यांच्या सुटकेसाठी स्वाक्षरी मोहीम 

युगंधर ताजणे-  पुणे : देशात कोरोनाच्या भीतीने सर्वजण घरात बसून आहेत. आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाने कैद्यांना पॅरोल आणि जामिनावर सोडले आहे. माझी आई शोमा सेन हिच्यासह आणखी एल्गारशी संबंधित ज्या व्यक्ती तुरुंगात आहेत त्यांना शासनाने जामीन द्यावा. विशेषत: मला माझ्या आजारी आईची खूपच काळजी वाटते.  आताची परिस्थिती लक्षात घेता त्यांना सोडावे. असे पत्र एल्गार प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांची मुलगी कोयल सेन यांनी राज्य शासनाला दिले आहे. कोयल सेन यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर यासारख्या सोशल माध्यमातून देखील ही विनंती शासनाला केली आहे. एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणाची कागदपत्रे आणि सुनावणी मुंबई येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयात वर्ग करण्यास येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी यापुढे मुंबईत सुरू आहे. सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्वस्तरातून काळजी घेण्यात आली आहे. 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना मुक्त करण्याचा आदेश नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याची अंमलबजावणी राज्यात तातडीने करण्यात आली असून त्यानुसार दररोज ठराविक संख्येने कैदी सोडण्यात येत आहे. कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दंगलीमागे काही शहरी माओवादी व्यक्तींचा सहभाग आहे या कारणावरून अनेकांना अटक करण्यात आली. त्यात शोमा सेन यांचाही समावेश आहे. मात्र त्यांची तब्येत बरी नसून गेल्या इतर कैदीप्रमाणे त्यांना मुक्त करावे असे कोयल सेन यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, कोविड 19 याची लागण तुरुंगात देखील होण्याची भीती आहे. जास्त गदीर्मुळे नियंत्रणाबाहेरची परिस्थिती आणखीनच बिघडेल. "देशभरातील तुरूंगांमध्ये अनेक कैदी आहेत, त्यांना अनेक वर्षे तुरुंगवास भोगावा लागत आहे. एल्गार प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा, कवी वरवरा राव, प्रा. शोमा सेन, सुधा भारद्वाज, यांच्यासह अरुण फरेरा, व्हर्नन गोंसालविस, सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन यासह एकूण 11 जण एल्गार प्रकरणी दोषी असल्याच्या प्रकरणात तुरुंगात आहेत.  यातील अनेकजण जेष्ठ आहेत. त्यांच्या आरोग्याचा शासनाने विचार करावा. असे कोयल सेन यांनी म्हटले आहे. देशातील अनेक तुरूंगांमध्ये योग्य रूग्णालये, पुरेसे डॉक्टर किंवा उपचाराची सुविधा नाही. केंद्र व राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी एल्गार प्रकरणातील  कैद्यांसह इतरही सर्व राजकीय कैद्यांना जामीन किंवा पॅरोल देण्यासाठी तात्काळ पावले उचलावतीत. 

* सर्व स्तरातून पाठिंबा, ४० हुन अधिक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचे समर्थन 

ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय, प्रा. गिल्बर्ट आचर, प्रा. जैरस बानजी, प्रा. शकुंतला बानजी, सुजातो भद्रा, तरुण भारतीया, प्रा. कमल मित्र, बर्नार्ड द मिलो, एस के दास, विद्याधर दाते, ऋतुजा देशमुख, झेवीयर दास, हर्ष कपूर यासारख्या समाजातील विविध स्तरातील व्यक्तींनी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन सर्व राजकीय कैद्यांना मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्राध्यापक, विचारवंत, चित्रपट निर्माते, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वकील क्षेत्रातील मान्यवरांनी याला आपले समर्थन दिले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकElgar morchaएल्गार मोर्चाState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारCourtन्यायालय