शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गोपीचंद पडळकरांचा पुन्हा एल्गार; धनगर आरक्षणासाठी जागर यात्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 14:42 IST

मी पहिले धनगर...मग आम.गोपीचंद पडळकर ; आरक्षणाचा हक्क न्यायालयीन मार्गाने मिळवण्याचा निर्धार ; संपुर्ण महाराष्टात धनगर जागर यात्रा 

आटपाडी - मी पहिला धनगर असून नंतर गोपीचंद पडळकर असल्याचे सांगत  धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर दौरे केला जाणार असल्याचा निर्धार आमदार पडळकर यांनी व्यक्त केला आहे. 12 ते 17 ऑक्टोबर असा पहिला टप्पा करणार आहेत.धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागील पाच वर्षांपूर्वी धनगर जागर यात्रा आयोजित केली होती.या जागर यात्रेतून त्यांनी महाराष्ट्र राज्यातील समस्थ धनगर समाजाला जागृत करण्याचे काम केले होते.

त्यावेळी राज्य सरकारला केंद्र सरकारकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास भाग पाडले होते. सध्या महाराष्ट्र राज्यात विविध समाज आपल्या आरक्षणाच्या न्याय व हक्कासाठी धरणे, मोर्चे याद्वारे आक्रमकतेने भूमिका मांडत आहेत. यामध्ये धनगर समाजातील अनेक नेते व कार्यकर्ते विविध ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. यातच काही दिवसांपूर्वी आमदार पडळकर यांनी सरकारला इशारा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत समाजाच्या भावनांचा आदर करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती.अन्यथा समाजाच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो असा इशारा दिल्यानंतर सरकारने दोन महिन्याचा कालावधी मागून घेतला आहे. 

याच पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांनी धनगर आरक्षणाचा जागर यात्रा सुरू केली असून त्यांचा पहिला टप्पा 12 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. यामध्ये 12 ऑक्टोबर मराठवाडा,13 ऑक्टोबर-उत्तर महाराष्ट्र, 14 ऑक्टोबर -विदर्भ, 16 ऑक्टोबर -पश्चिम महाराष्ट्र, 17 ऑक्टोबर-कोकण अशी धनगर जागर यात्रा होणार आहे. यावेळी पडळकर म्हणाले की, धनगर आरक्षणाचा हक्क आम्ही न्यायालयीन पातळीवर लढतच आहोत. तो लढा आम्ही जिंकून आमचा हक्क आम्ही मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही. यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रात धनगर जागर यात्रेच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र करण्याचे काम सुरू आहे.त्याचा पहिला टप्पा सुरू करत आहोत.आणि ही लढाई सर्वांच्या साथीने निश्चित जिंकू असं त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षण