शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
4
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
5
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
6
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
7
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
8
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
9
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
10
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
11
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
12
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
13
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
14
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
15
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
16
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
19
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
20
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

अकरावीची दुसरी यादी जाहीर

By admin | Updated: July 4, 2016 20:37 IST

अकरावी आॅनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. यावेळी कला शाखेचा कट आॅफ ९४ टक्क्यांवर गेला असून,

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ४  : अकरावी आॅनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. यावेळी कला शाखेचा कट आॅफ ९४ टक्क्यांवर गेला असून, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा कट आॅफही ९२ टक्क्यांवर स्थिरावला आहे.दुसऱ्या यादीत ५९ हजार ५०७ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.त्यात नव्याने अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२ हजार ४६८ इतकी आहे. पहिल्या यादीत नाव आल्यानंतर प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांमुळे प्रथम पसंतीचे महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या यादीत बेटरमेंटचा पर्याय उपलब्ध झाला होता. त्यानुसार दुसऱ्या यादीत ३७ हजार ०३९ विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळालेले आहे.

शिवाय आणखी १० हजार ८०३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. तर ६ हजार ८२९ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि ५ हजार ४२५ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली. बेटरमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश घेतलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश आॅनलाईन रद्द करायचा आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की, पहिल्या यादीतील प्रवेश रद्द केल्यानंतर दुसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

त्यासाठी विद्यार्थ्यांना ५, ७ व ८ जुलै हा तीन दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नाव कुठल्याही कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आले नसेल, त्यांनी पुढच्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.त्या विद्यार्थ्यांनाही मिळाला प्रवेशदादर येथील बंद पडलेल्या शारदा मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव तांत्रिकचूकीमुळे आॅनलाईन यादीत राहिले होते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनापहिल्या गुणवत्ता यादीत हे महाविद्यालय निश्चित झाले. प्रत्यक्षातमहाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माणझाले होते. याप्रकरणाची तातडीने दखल घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयानेसंबंधित विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत पात्रतेनुसार इतरमहाविद्यालयांत प्रवेश मिळवून दिला.दुसऱ्या गुणवत्ता यादीमधील बोर्डनिहाय व शाखानिहाय प्रवेश निश्चितझालेल्या विद्यार्थ्यांची संख्या -बोर्ड कला वाणिज्य विज्ञान एकूणएसएससी ३,०५६ ३५,९७२ १७,१३९ ५६,१६७सीबीएसई १३० ३८४ ५९८ १,११२आयसीएसई २०२ ७५२ ६९२ १,६४६आयबी ० ० ० ०आयजीसीएसई ४० १०१ ८५ २२६एनआयओएस ३६ १०७ ०५ १४८इतर १५ १२५ ६८ २०८