शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ फेरी होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 07:54 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ या वर्षातील प्रवेश प्रक्रिया जुलै २०२० पासून सुरू झाली. विलंबित प्रक्रियेमुळे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या महापालिका क्षेत्रांतील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेऱ्यांचे आयोजन करण्याला मान्यता देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी याबाबत अध्यादेश काढला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ या वर्षातील प्रवेश प्रक्रिया जुलै २०२० पासून सुरू झाली. विलंबित प्रक्रियेमुळे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले. त्यात ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ ही फेरी रद्द करण्यात आली. मात्र विशेष फेरीस होणारा विलंब आणि प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांची वाढती संख्या यामुळे एफसीएफएस फेरीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी ट्विटरद्वारे माहिती दिली. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी याबाबत नवा अध्यादेश काढला. त्यामुळे उर्वरित प्रवेशास ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरीअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.

दुसऱ्या विशेष फेरीतील प्रवेशांना मुदतवाढदुसऱ्या विशेष फेरीतील प्रवेशासाठी मुंबई विभागातून २१,८३५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. तर प्रवेश निश्चितीस ८ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. दरम्यान, बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी वेळ वाढवून मागितल्याने ८ जानेवारीपर्यंत त्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ पर्यंत आपले दुसऱ्या फेरीचे प्रवेश निश्चित करू शकणार आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालय