शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अकरा जहाल नक्षल्यांनी शस्त्र ठेवले अन् संविधान हाती घेतले; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधान हाच प्रगतीचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 06:44 IST

तीन विभागीय समिती सदस्य, दोन एरिया समिती सदस्य, एक उपकमांडर व चार दलम सदस्य यांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सर्वांचे आत्मसमर्पण झाले. या सर्वांवर सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचे बक्षीस होते.

 

गडचिरोली : तब्बल ३८ वर्षे नक्षल चळवळीत राहून सदस्य ते दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य अशी वाटचाल करत ६६ गुन्हे दाखल असलेल्या जहाल महिला माओवादी नेता व केंद्रीय समिती सदस्य  भूपती याची पत्नी विमला चंद्रा सिडाम उर्फ तारा उर्फ वत्सला उर्फ तारक्का हिच्यासह ११ जणांनी १ जानेवारीला शस्त्र खाली ठेवले व संविधान हाती घेऊन सन्मानाने जीवन जगण्याची शपथ घेतली. 

 तीन विभागीय समिती सदस्य, दोन एरिया समिती सदस्य, एक उपकमांडर व चार दलम सदस्य यांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सर्वांचे आत्मसमर्पण झाले. या सर्वांवर सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पणानंतर या सर्वांचे शासनाकडून पुनर्वसन होणार आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पोलिस दलाला ५ बस, १४ चारचाकी, ३० मोटारसायकलचे लोकार्पण करण्याचे आले. पोलिस दलाच्या नूतन हेलिकॉप्टर हॅंगरचे उद्घाटनही करण्यात आले. विविध नक्षल चकमकींत शौर्य दाखविणाऱ्या सी-६० च्या जवानांचा गौरव करण्यात आला.

माओवादी विचारसरणीला थारा नाही : फडणवीससरत्या वर्षात उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल. गेल्या ४ वर्षांत एकही युवक किंवा युवती माओवादी चळवळीत सहभागी झाली नाही, ही फार मोठी उपलब्धी आहे. ११ गावांनी नक्षलवाद्यांना बंदी केली आहे.   न्याय मिळायचा असेल, तर भारतीय संविधानानेच मिळू शकतो, तो माओवादी विचारसरणीने मिळू शकत नाही, हे जनतेला आता पटले आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

एक हजार कोटींच्या शेअर्सचे वाटप- लॉईड कंपनीद्वारे कर्मचाऱ्यांना एक हजार कोटी रुपयांचे शेअर्स देण्यात आले.- कंपनीच्या कामाच्या गतीमुळे पुढील पाच वर्षांत शेअर्सचे मूल्य पाच पटीने वाढेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. - यावेळी पद्मश्री डॉ. तुलसी मुंडा यांना फडणवीस यांच्या हस्ते कंपनीच्या १० हजार शेअर्सचे प्रमाणपत्र देण्यात आले. 

यांनी केले आत्मसमर्पण तारक्कासह विभागीय समिती सदस्य सुरेश बैसागी उउईके उर्फ चैतू उर्फ बोटी, कल्पना गणपती तोर्रेम उर्फ भारती उर्फ मदनी, अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश, एरिया  कमिटी सदस्य वनिता सुकलु धुर्वे उर्फ सुशीला, सम्मी पांडु मट्टामी उर्फ बंडी, उपकमांडर निशा बोडका हेडो उर्फ शांती, दलम सदस्य  श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना,  शशिकला पत्तीराम धुर्वे उर्फ श्रुती, सोनी सुक्कु मट्टामी, आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते.

गडचिरोलीत पहिला दिवस; एसटीतून प्रवास नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीत जिल्ह्यातच व्यतित केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी एसटी बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला आणि त्या बसमधून प्रवासही केला. 

कोनसरी (ता.चामोर्शी) येथे लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या (लॉईड) विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. या प्रकल्पामुळे ६,२०० कोटींची गुंतवणूक जिल्ह्यात झाली असून ९ हजार लोकांना रोजगार मिळत आहे. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस