शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

एलिफंटा बोट दुर्घटनेतील काही मृतांची ओळख पटली, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 23:43 IST

Elephanta Boat Accident: मुंबईजवळील समुद्रात बुचर बेटांजवळ एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईजवळील समुद्रात बुचर बेटांजवळ एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ७ पुरुष, ४ महिला आणि २ लहान मुलांचा समावेश असून, मृतांपैकी काहींची ओळख पटवण्यात यश आलं आहे. मृतांमध्ये १० पर्यटक प्रवाशांसह नौदलाच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या काही जणांची नावं समोर आली आहेत. या दुर्घटनेतील मृतांमध्ये  महेंद्रसिंग शेखावत ( नौदल),  प्रवीण शर्मा (NAD बोट वरील कामगार),  मंगेश (NAD बोट वरील कामगार), मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी बोट), राकेश नानाजी अहिरे( प्रवासी बोट), साफियाना  पठाण (मयत महिला), माही पावरा (मयत मुलगी वय-३ ), अक्षता राकेश अहिरे, मिथु राकेश अहिरे (८ वर्षे), दिपक व्ही यांची ओळख पटली आहे. तर मृतांमधील एक पुरुष आणि दोन महिलांची ओळख पटलेली नाही.

दरम्यान, नौदलाच्या पेट्रोलिंग बोटीवरील चालक आणि सबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौदलाच्या बोटीवर सहा जण होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. 

या दुर्घटनेबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईजवळील समुद्रात असलेल्या बुचर बेटांजवळ आज ३ वाजून ५५ मिनिटांनी नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या एका बोटीने धडक दिल्याने मोठा अपघात झाला. संध्याकाळी ७.३० पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामधून आतापर्यंत १०१ जणांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आलं आहे. मात्र या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या १३ लोकांमध्ये १० नागरिक आणि ३ नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय दोन जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. त्यांना नौदलाच्या रुग्णालयातच दाखल करण्यात आलं आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र