शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

इलेक्ट्रॉनिक्स शाखेला मिळेनात विद्यार्थी!

By admin | Updated: June 17, 2017 14:52 IST

बारावीनंतर करिअर म्हणजे इंजिनिअरिंग असे समीकरण रुढ असलेल्या मराठवाड्यात आता या क्षेत्राबद्दलचे आकर्षण हळूहळू का होईना पण ओसरताना दिसत आहे.

- मयूर देवकर/ ऑनलाइन लोकमत

 
औरंगाबाद, दि. 17 - बारावीनंतर करिअर म्हणजे इंजिनिअरिंग असे समीकरण रुढ असलेल्या मराठवाड्यात आता या क्षेत्राबद्दलचे आकर्षण हळूहळू का होईना पण ओसरताना दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि आयटी या दोन अभियांत्रिकी शाखांना गेल्या वर्षी औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात थंड प्रतिसाद मिळाला. काही महाविद्यालयांमध्ये तर एकही जागा भरली गेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील पाच ते सहा महाविद्यालयांनी या शाखेतील प्रवेश थांबवावे अशी मागणी तंत्र शिक्षण संचालनालयाकडे केली आहे.
 
औरंगाबाद शहराचा विचार केला असता गेल्या वर्षी येथील दहा महाविद्यालयामध्ये  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन शाखेच्या ७४२ जागांपैकी केवळ १४१ जागा सामान्य प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या टप्प्यापर्यंत (कॅप राउंड ४) भरल्या गेल्या. म्हणजे ६०१ जागांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. यामध्ये मॅनेजमेंटच्या जागा गृहीत धरण्यात आलेल्या नाहीत. एकेकाळी विद्यार्थी आणि पालकांची आवड असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेची झळाळी अशी उतरावी हे बदलत्या काळाचे सूचक आहे.
एकूण अभियांत्रिकी क्षेत्रामध्येच मोठे बदल होत आहे. चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त जागा भरल्याच जात नाही. मागच्या चार वर्षांत अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत १८ टक्क्यांची घट झाली आहे. मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हील, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकिच्या प्रमुख शाखा म्हणून ओळखल्या जातात. किमान मराठवाड्यात तरी प्रवेश संख्येत घट होण्याचा सर्वात मोठा फटका इलेक्ट्रॉनिक्स शाखेला बसला आहे.
 
शहर व परिसरातील हाय-टेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या दोन महाविद्यालयांमध्ये मागच्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स शाखेत प्रत्येकी ६० जगांवर कॅप राऊंडद्वारे एकही प्रवेश झाला नाही. जीएसएमच्या एमआयटी कॉलेजमध्ये तर १८० पैकी केवळ १० जागा भरल्या गेल्या. पीईएसमध्ये ५२ तर देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १८० पैकी ८५ जागा रिकाम्या राहिल्या.
 
रोजगार घटला, प्रवेश घटले
‘अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदे’च्या आकडेवारीनुसार केवळ ४० टक्के इंजिनिअर्स नोकरी मिळण्याच्या पात्रता योग्य आहेत. महाराष्ट्रात तर अभियांत्रिकी महाविद्यालयांचा रोजगार दर केवळ ३५ टक्के आहे. म्हणजे ६५ टक्के विद्यार्थ्यांना पदवीनंतर नोकरीसाठी वणवण करावी लागते. नोकऱ्यांची संख्या घटल्याने बेरोजगारी वाढली आणि त्यामुळेच प्रवेशसंख्येत घट झाली. तसेच सध्याचा अभ्यासक्रम झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत कित्येक वर्ष मागे आहे. यामुळे कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्यात महाविद्यालये अपयशी ठरत आहेत.
 
इलेक्ट्रिकल आणि सिव्हीलला ‘अच्छे दिन’
विद्यार्थ्यांच्या प्राधान्य क्रमात सर्वात शेवटी राहणाऱ्या इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल शाखांकडे आता ओढा वाढू लागला आहे. ऊर्जा क्षेत्रात होणारी मोठी उलथापालथ आणि बांधकाम व निर्मिती क्षेत्राची वाढलेली मागणी यामुळे या क्षेत्रात रोजगाराची संधी मोठ्या प्रमणात उपलब्ध होत आहे. स्पर्धा परीक्षाद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. म्हणजे नोकऱ्या जास्त आणि प्रशिक्षित उमेदवार कमी अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळे या क्षेत्रात तेजी दिसून येते.
 
 
कॅपच्या चौथ्या टप्प्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या प्रवेशांचे विवरण (२०१६-१७)
महाविद्यालय          प्रवेशरिकाम्या जागा    एकूण जागा
हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी       ०     ६०६०
श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पडारी गाव       ०     ४८४८
श्रीयश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी     ३     २७३०
औरंगाबाद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग                ४     ३९४३
साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ४     ३२३६
इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग ५     ४०४५
पीईएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग          ८     ५२६०
छत्रपती शाहु कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग          १२     ४८६०
जीएसएम मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी       १०     १७०१८०
देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग            ९५        ८५१८०