शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वीजदरवाढीचा प्रस्ताव ग्राहकांचे कंबरडे मोडणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 06:24 IST

तज्ज्ञांचे मत; औद्योगिक विकासावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरणने पाच वर्षांत एकूण ६० हजार ३१३ कोटी रुपयांचा अतिरिक्त वसुली मागणारा, सरासरी एकूण २०.४ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला असून, या प्रस्तावामुळे राज्यातील सर्वसामान्य घरगुती ग्राहक, व्यापारी ग्राहक, औद्योगिक ग्राहकांचे कंबरडे मोडणारा आहे. ही बाब राज्याच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासास खीळ घालणारा आहे, असे मत वीजतज्ज्ञांनी मांडले.महावितरणच्या वीजदरवाढीच्या प्रस्तावावर नवी मुंबई येथील सिडको भवनात जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेने वीजदरवाढीवर आपले म्हणणे मांडले. संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी याबाबत सांगितले की, महावितरणने जाहिरातीमध्ये १, २ आणि ५ टक्के असे आकडे दाखविले आहेत. महावितरणचा सध्याचा सरासरी पुरवठा आकार ६ रुपये ७३ पैसे प्रति युनिट आहे. २०२०-२१ मधील हा आकार ७ रुपये २४ पैसे प्रति युनिट म्हणजे ७.६ टक्के आहे. २०२४-२५ मधील आकार ८ रुपये १० पैसे प्रति युनिट आहे. म्हणजेच सध्याच्या दराच्या तुलनेने एकूण वाढ २०.४ टक्के आहे. सध्याचे औद्योगिक वीजदर शेजारील राज्यांपेक्षा २० ते ४० टक्क्यांनी अधिक आहेत. परिणामी महावितरणच्या वीजदरवाढीच्या प्रस्तावास मंजुरी देणे म्हणजे वीजग्राहकांवर अन्याय आहे.वीजदरवाढीचा फटका उच्चदाब, लघुदाब औद्योगिक ग्राहक, यंत्रमागधारक, व्यापाऱ्यांना बसेल. दरवाढ एप्रिल २०२० पासून अपेक्षित असून आताच्या दराच्या तुलनेत किमान १५ ते ३० टक्के अधिक होऊ शकते, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे.

टॅग्स :electricityवीज