शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

वीज ३७ टक्के कडाडली, ग्राहकांनो..हरकती मांडा! इलेक्ट्रिसिटी ड्युटी रकमेचा अतिरिक्त बोजा पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 05:44 IST

महावितरणने पुढील दोन वर्षांसाठी वीज दरवाढीची मागणी केली असून, ही दरवाढ सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट म्हणजे सरासरी ३७ टक्के आहे.

मुंबई :

महावितरणने पुढील दोन वर्षांसाठी वीज दरवाढीची मागणी केली असून, ही दरवाढ सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट म्हणजे सरासरी ३७ टक्के आहे. दरवाढीच्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ड्यूटी रकमेचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार असल्याने राज्यातील वीज ग्राहकांना शॉक बसणार आहे.

राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांना ही दरवाढ शॉक देणारी असून, येऊ घातलेल्या उद्योगांना रोखणारी व असलेल्या उद्योगांना राज्याबाहेर ढकलणारी आहे. महावितरणच्या या भरमसाठ दरवाढ मागणीला राज्याच्या काेनाकोपऱ्यातून वीज ग्राहक व विविध औद्योगिक, शेतकरी, रहिवासी व ग्राहक संघटनांनी विरोध करावा. हरकती नोंद कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केले आहे.

इलेक्ट्रिसिटी ड्यूटी एकूण वीज आकारावर घरगुती वीज ग्राहकांना १६ %, व्यापारी वीज ग्राहकांना २१ %, औद्योगिक वीज ग्राहकांना ७.५ % भरावी लागेल.

महावितरणच्या याचिकेमध्ये आगामी दोन वर्षांमध्ये ६७,६४४ कोटी रुपये तूट भरपाईची मागणी करण्यात आली आहे.३७ % दरवाढीची याचिका जाहीरग्राहक वर्गवारी    सध्याचे दर    २०२३-२४     २०२४- २५ ० ते १०० युनिटस्     ३.३६     ४.५०     ५.१० १०१ ते ३०० युनिटस्     ७.३४    १०    ११.५० ३०१ ते ५०० युनिटस्     १०.३७     १४.२०     १६.३० ५०० युनिटस् वर     ११.८६    १६.३०     १८.७० 

इलेक्ट्रिसिटी ड्यूटीची आकारणी वरील टक्केवारी नुसार स्थिर / मागणी आकार, वहन आकार, वीज आकार व असल्यास इंधन समायोजन आकार या चारही आकारांच्या बेरजेवर लागू राहील.

२०२३-२४ मध्ये ८.९० रुपये प्रति युनिट व २०२४-२५ मध्ये ९.९२ रुपये प्रति युनिट याप्रमाणे दरनिश्चितीची मागणी आहे. सरासरी वाढ दाखविताना अनुक्रमे १४ टक्के व ११ टक्के दाखविली आहे. ग्राहकांच्या डोळ्यांत ही धूळफेक आहे. खरी दरवाढ मागणी सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट म्हणजे ३७ टक्के आहे. १० टक्क्यांवर दरवाढ हा टॅरिफ शॉक ठरतो. त्यामुळे १० टक्क्यांहून अधिक दरवाढ करता कामा नये. - प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना 

टॅग्स :electricityवीज