शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वीजग्राहकांना आता मिळणार अचूक बिल, अडीच लाख नादुरुस्त मीटर बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:33 IST

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागांतर्गत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत, विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे वसूल करण्याकामी अडसर ठरणाऱ्या नादुरुस्त असे दोन लाख ६२ हजार सिंगल फेज मीटर बदलण्यात आले आहेत. परिणामी, ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराबाबतचे अचूक बिल देणे शक्य होणार असून, नादुरुस्त मीटरमुळे महावितरणचा होणारा आर्थिक तोटा थांबणार आहे.

मुंबई - महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागांतर्गत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत, विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे वसूल करण्याकामी अडसर ठरणाऱ्या नादुरुस्त असे दोन लाख ६२ हजार सिंगल फेज मीटर बदलण्यात आले आहेत. परिणामी, ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराबाबतचे अचूक बिल देणे शक्य होणार असून, नादुरुस्त मीटरमुळे महावितरणचा होणारा आर्थिक तोटा थांबणार आहे.महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागांतर्गत आजघडीस भांडुप, कल्याण, कोकण व नाशिक असे चार झोन येतात. यामध्ये सुमारे ७० लाख इतक्या ग्राहकांना महावितरण सेवा पुरवत आहे. यातील काही ग्राहकांना नादुरुस्त मीटरमुळे कधी कमी, तर कधी वाढीव बिल जात होते. त्यामुळे वाढीव बिल आल्यास ग्राहकांना बिल दुरुस्त करून घेण्याचा मनस्ताप होत होता, तर वापरलेल्या युनिटपेक्षा कमी बिल गेल्यास महावितरणला आर्थिक फटका बसण्याची शक्यता होती.परिणामी, ग्राहकांकडून प्राप्त होणाºया तक्रारी व आयटी विभागाच्या अहवालानुसार, मागील तीन महिन्यांत कोकण प्रादेशिक विभागांतर्गत सुमारे दोन लाख ६२ हजार सिंगल फेज मीटर बदलण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने बंद वीजमीटर, डिस्प्ले खराब झालेले मीटर, तसेच नादुरुस्त मीटर (वीजबिलाची कमी-अधिक नोंद) बदलण्यात आले आहेत. यामध्ये विजेच्या वापराबाबतच्या नोंदीकरिता गोल चक्र असणारे, तसेच जुन्या प्रकारचे इलेक्ट्रो मग्नेटिक मीटरही बदलण्यात आले आहे.२७ मार्च अखेर बदलण्यात आलेल्या नादुरुस्त मीटरची आकडेवारीभांडुप परिमंडळ - सुमारे ८६ हजार (ठाणे शहर व परिसर, मुलुंड, भांडुप, नवी मुंबई, पनवेल शहर)कल्याण परिमंडळ - सुमारे १ लाख ७ हजार (कल्याण, पालघर, पेण, वसई)कोकण परिमंडळ - सुमारे १८,८०० (रत्नागिरी व सिंधुदुर्ग)नाशिक परिमंडळ - सुमारे ४९ हजार (नाशिक, अहमदनगर, मालेगाव)२७ मार्चअखेरबदललेले नादुरुस्त मीटरपनवेल विभाग - २३,३०० नेरूळ विभाग - ८,३०० वाशी विभाग - १३,८००भांडुप विभाग - ५,२०० मुलुंड विभाग - ४,९०० ठाणे १ विभाग - ५,८००ठाणे २ विभाग - ८,००० ठाणे ३ विभाग - ४,२०० वागळे इस्टेट - १२,४००नादुरुस्त मीटर बदलण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित ग्राहकांना योग्य बिले मिळणार आहे. यापूर्वी वाढीव बिले गेलेल्या ग्राहकांना त्यांच्या बिलात समायोजन (अ‍ॅडजेस्टमेंट) करून बिल देण्यात येईल. सदोष मीटरमुळे कमी बिले गेलेल्या ग्राहकांना नवीन मीटर बसविल्यानंतर प्रत्यक्ष विजेचा वापर आणि पूर्वीचे नादुरुस्त/स्लो मीटर यांच्या वापरातील मागील तीन महिन्यांच्या बिलांचे समायोजन पुढील बिलात करण्यात येईल.- सतीश करपे, संचालक, महावितरण प्रादेशिक.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र