शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

औष्णिक विजेचा शॉक !

By admin | Updated: March 1, 2016 03:57 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कोळशाच्या वापरावरील स्वच्छ ऊर्जा अधिभाराचा (क्लीन एनर्जी सेस) दर प्रति टन २०० रुपयांवरून थेट दुप्पट करत ४०० रुपये केल्याने कोळशावर आधारित वीज महाग होणार आहे

स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ ,  मुंबईकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कोळशाच्या वापरावरील स्वच्छ ऊर्जा अधिभाराचा (क्लीन एनर्जी सेस) दर प्रति टन २०० रुपयांवरून थेट दुप्पट करत ४०० रुपये केल्याने कोळशावर आधारित वीज महाग होणार आहे. राज्य सरकारची वीजनिर्मिती कंपनी असलेल्या एकट्या ‘महानिर्मिती’ची वीज या अधिभारापोटी ९८० कोटी रुपयांनी तर मुंबईसाठी वीज तयार करणाऱ्या रिलायन्स एनर्जीच्या डहाणू येथील प्रकल्पातील वीज ४८ कोटी रुपयांनी महाग होणार असून, त्याचा फटका वीजग्राहकांना बसणार आहे. कोळशाच्या वापराने पर्यावरणाचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी स्वच्छ ऊर्जा अधिभार सुरू झाला, त्या वेळी तो ५० रुपये प्रति टन होता. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर जुलै २०१४मध्ये तो १०० रुपये झाला. मागच्या वर्षी तो २०० रुपये झाला आणि यंदाच्या अर्थसंकल्पात जेटली यांनी हा स्वच्छ ऊर्जा अधिभाराचा दर थेट ४०० रुपये केला आहे. यामुळे आपल्या कोळशाचा दर २० टक्क्यांनी वाढेल, असे कोल इंडियाने म्हटले आहे. आमच्या कोळशाचा सरासरी दर हा १००० ते ११०० रुपये प्रति टन असून, स्वच्छ ऊर्जा अधिभाराचा दर वाढल्याने या कोळशाचे दर २० टक्क्यांनी वाढतील, अशी प्रतिक्रया कोल इंडियाने दिली आहे.‘महानिर्मिती’ची एकूण वीजनिर्मिती क्षमता १२,०७७ मेगावॉट आहे. त्यापैकी ८,६४० मेगावॉट वीज ही सात औष्णिक वीज प्रकल्पांतून तयार होते. त्यासाठी वर्षाला सरासरी ४९ दशलक्ष टन कोळसा वापरला जातो. सध्या ‘महानिर्मिती’ प्रति टन २०० रुपयांच्या दराने ४९ दशलक्ष टन कोळसा वापरासाठी ९८० कोटी रुपये स्वच्छ ऊर्जा अधिभार म्हणून जमा करत होती. आता या अधिभाराचा दर ४०० रुपये होत असल्याने एप्रिल २०१६पासून १९६० कोटी रुपये केंद्राकडे जमा करावे लागतील. म्हणजेच आता ९८० कोटी रुपये जादा भरावे लागतील. देशातील एकूण विजेपैकी कोळशावरील विजेचे प्रमाण हे तब्बल 61%आहे. त्यामुळे स्वच्छ ऊर्जा अधिभाराचा दर दुप्पट केल्याचा मोठा परिणाम विजेच्या दरावर होणार आहे. महाराष्ट्रात मुळात औद्योगिक वीजदर जास्त असून आता वीज आणखी महाग होणार असल्याने हा प्रश्न बिकट होणार आहे.काय म्हणाले अरुण जेटली?आपल्या भाषणामध्ये ‘आधार’बाबत बोलताना अर्थमंत्री म्हणाले, सर्वप्रथम आम्ही आधारद्वारे सरकारी मदत आणि सबसिडीचे लाभधारक सुनिश्चित करू आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडले जाईल. सार्वजनिक निधी कोणत्याही गळतीविना गरीब आणि खऱ्या लाभार्थींना मिळाला पाहिजे.