पोलादपूर : गेले आठ दिवस संततधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी रात्री पावसाने उग्र रूप धारण करत वादळी वाऱ्यासह अतिदुर्गम भागातील पळचील येथे एक झाड विद्युत वाहक तारांवर उन्मळून पडले. यामुळे येथे दोन्ही बाजूचे विद्युत खांब वाकल्याने विद्युत वाहक तारा जमिनीवर लोंबकळत आहेत. तर या घटनेमुळे पळचील माध्यमिक व प्राथमिक शाळा परिसरातील विद्युत ट्रान्सफॉर्मर असणारे पोल वाकले आहेत. यामुळे येथे विद्यार्थी व जनतेच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, यावेळी विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.सावरीची वाडी येथे गंजलेला एक जुनाट विद्युत खांब वादळात जमीनदोस्त झाल्याने आाजूबाजूचे विद्युत खांब वाकून सावरीची वाडी पळचील रस्त्याच्या दुतर्फा विद्युत वाहक तारा लोंबकळत रस्त्यावर आल्या आहेत. यामुळे येथील जनतेच्या जीविताला धोका निर्माण झाला असून शनिवारी सकाळी माध्यमिक शाळेत पळचील येथे येणारे शाळकरी विद्यार्थी रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तारांच्या खालून वाकून शाळेत पोहोचले. या घटनेची माहिती मिळताच विद्युत वितरण कंपनीचे काँट्रॅक्टमध्ये काम करणारे कर्मचारी भार्गव येलंगेसह चार कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र विद्युत वितरण कंपनीचा कोणीही अधिकारी घटनास्थळी न आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. >रानसई परिसरात समाधानकारक पाऊसउरण: मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने बरसणाऱ्या पावसामुळे उरण शहर, ग्रामीण आणि औद्योगिक भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई, पुनाडे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला आहे. पाऊस पडण्याची स्थिती अशीच राहिली तर रानसई धरण जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत ओसंडून वाहू लागेल. >एमआयडीसीचे कनिष्ठ अभियंता रणजित काळेबाग यांनी पुराची माहिती दिली. उरण शहर, ग्रामीण भागातील ३५ गावे आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्राला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ११६ फूट उंचीचे हे धरण आहे. >धरणात सध्या १०० फूट ९ इंच पाणी जमा झाले आहे. उरण पूर्व भागातील पुनाडे, वशेणी, पिरकोन आदि १० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरण क्षेत्रातही समाधानक ारक पाऊस पडला आहे. तर चिरनेर येथील आक्कादेवी धरणही ओसंडून वाहू लागले आहे.
विद्युत वाहक तारेवर पडले झाड
By admin | Updated: July 4, 2016 03:22 IST