शहरं
Join us  
Trending Stories
1
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
2
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
3
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
8
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
11
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
13
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
14
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
15
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका, सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 07:26 IST

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच निवडणुका; सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला फटकारले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आधीच अधिसूचित केलेल्या महाराष्ट्रातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला फटकारले आहे, अशी कृती केल्यास तो न्यायालयाचा अवमान समजून राज्य निवडणूक आयोग व संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. ज्या ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे तिथे ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही. 

पाऊस, पुरामुळे तारखा बदलता येतीलन्या. अजय खानविलकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल पहिली अधिसूचना जारी झाली, तोच कार्यक्रम कायम राहील. मात्र पाऊस, पुरामुळे निवडणुकांच्या तारखा बदलता येऊ शकतील. राज्य निवडणूक आयोगाने मूळ निवडणूक कार्यक्रमात बदल करू नये.

राज्य निवडणूक आयोगालाबदल करण्याचा अधिकार नाहीसर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय खानविलकर, न्या. अभय ओक, न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, ओबीसी आरक्षणाशिवाय ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे २० जुलैच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार नाही. मात्र, ते निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करू शकतात. या ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ९२ नगरपालिका, चार नगरपंचायती आणि २७१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

निवडणुका नीट पार पाडण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे काम न्यायालयाने सांगितले की, ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नीट पार पाडण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे काम आहे. ते त्याने करायला हवे. सर्वोच्च न्यायालयाच्या २० जुलैच्या आदेशात काही सुधारणा कराव्यात, अशी विनंती महाराष्ट्र सरकारने न्यायालयाला केली होती. सर्वोच्च न्यायालयाने २० जुलैच्या आदेशात म्हटले होते की, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर व्हायचा आहे, तिथे मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार ओबीसी आरक्षण देण्याचा विचार दोन आठवड्यांच्या मुदतीत करावा.

पुनर्विचार याचिका दाखल करणार : फडणवीसnराज्यातील ९२ नगरपालिकांसह ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासहच निवडणुका घ्याव्यात, अशी पुनर्विचार याचिका राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितले. nयाशिवाय अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने फेरविचार याचिका दाखल करण्याचा इरादा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे बोलून दाखविला. ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेशला जो निर्णय दिला तो आम्हाला द्या, अशी मागणी आम्ही केली होती. त्याप्रमाणे कोर्टाने निकाल दिला होता आणि आज पुन्हा वेगळा निर्णय आला आहे, ही धक्कादायक बाब आहे, असेही भुजबळ म्हणाले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसElectionनिवडणूक