शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

२२० बाजार समित्यांच्या निवडणुका; हवेत ३०० कोटी

By राजाराम लोंढे | Updated: August 4, 2022 06:03 IST

उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसेना : निर्णयावर फेरविचार करण्याचे प्रयत्न

- राजाराम लोंढेलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बाजार समित्यांच्या निवडणुकांत कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मताचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने राज्यातील प्रलंबित २२० समित्यांच्या निवडणुकांसाठी किमान ३०० कोटींचा निधी लागणार आहे. समित्यांचे उत्पन्न व खर्च पाहता राज्यातील एकही समिती खर्च करू शकत नसल्याने महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाने त्याला विरोध केला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत फेरविचार करण्याची मागणी केली जाणार आहे.  

 बाजार समित्यांवर शेतकऱ्यांचे वर्चस्व राहावे, यासाठी कार्यक्षेत्रातील गावात शेतकऱ्यांनी निवडून दिलेले विकास संस्थांचे संचालक, ग्रामपंचायतींच्या सदस्यांना मताचा अधिकार दिला. त्याशिवाय समितीशी संबंधित व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदार यांचे प्रतिनिधीही संचालक मंडळात असतात. राज्यात तत्कालीन फडणवीस सरकारने २०१८ मध्ये कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला. आता एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा निर्णय फिरवत सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाड्यासारख्या भागात बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांना ६-६ महिने पगार नाहीत. त्या समित्या निवडणुकांवर कोट्यवधींचा खर्च कसा करणार? सरकारला निवडणूक निधी द्यावा लागेल, त्यामुळे सरकार याबाबत फेरविचार करेल, अशी आशा आहे.- प्रवीणकुमार नाहाटा (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघ).

सोलापूर, बार्शी बाजार समित्यांचे कंबरडे मोडले महायुतीने निर्णय घेतल्यानंतर २०१८ मध्ये कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मताचा अधिकार देत सोलापूर व बार्शी बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या. यासाठी सोलापूरला १ कोटी १४ लाख तर बार्शी समितीला ७४ लाख ५० हजार रुपये खर्च आला होता. या खर्चाने त्यांचे कंबरडे मोडले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीEknath Shindeएकनाथ शिंदे