शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून पालिका निवडणुका पुढे ढकलल्या; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत राज ठाकरेंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 20:28 IST

ओबीसींचं आरक्षण रद्द झालं हे निवडणुका पुढे ढकलण्यामागचं कारण नाही; राज ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

पुणे: राज्यातील महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यामागचं खरं कारण ओबीसींचं आरक्षण नव्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नाही, हे निवडणुका पुढे ढकलण्यामागचं प्रमुख कारण असल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. मनसेच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त ते पुण्यात बोलत होते. ओबीसींचं आरक्षण केवळ लोकांना सांगण्यापुरतं असल्याचं राज यांनी म्हटलं.

निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचं मी माझ्या सहकाऱ्यांना नोव्हेंबरपासूनच सांगत होतो. निवडणुका जवळ आल्या की जाणवतं. निवडणूक चढायला लागते. मला तसं काहीच जाणवत नव्हतं. ओबीसी समाजाचं आरक्षण गेल्यानं निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या हे कारण खोटं आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती निवडणुका पुढे ढकलण्यामागचं खरं कारण आहे, असं राज ठाकरे म्हणाले. निवडणुका पुढे ढकलणं सरकारसाठी सोयीचं आहे. तीन महिन्यांनी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांनी निवडणूक म्हणजे जून महिना उजाडेल. पावसात निवडणुका घेणार आहात का, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. पालिकांची मुदत संपली की प्रशासक नेमायचा. तो आपल्या मर्जीतला नेमला की मग पालिका आपल्याच हातात, असा सरकारचा डाव असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

निवडणुका लोकांना हव्यात का याचा राजकीय पक्षांनी जरा कानोसा घ्यावा. लोकांना काहीच वाटत नाही. तुमच्या निवडणुका झाल्या काय आणि नाही झाल्या काय लोकांना त्याचं काहीच वाटत नाही, हे कानोसा घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका लागल्या असत्या तरीही लोकांच्या आयुष्यात काही बदल झाला नसता. निवडणुका आता थेट दिवाळीनंतरच लागतील, असा अंदाज राज यांनी वर्तवला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे