शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एकनाथ शिंदेंची एक चाल अन् उद्धव ठाकरे गटाची २३ लाख कागदपत्रे बाद होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 22:27 IST

दुसरीकडे ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर २३ लाख कागदपत्रे सादर केलीत हे शिंदे गटासमोर आव्हान होते. त्यात शिंदे गटाची कागदपत्रे अवघे साडे चार लाख आहेत. 

नवी दिल्ली - धनुष्यबाण कुणाचा हा फैसला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. शिंदे-ठाकरे गटाच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने ३० जानेवारीपर्यंत दोन्ही गटाला लेखी युक्तिवाद सादर करण्याची मुदत दिली होती. ही मुदत संपण्यापूर्वी ठाकरे गटाने ४ वाजता लेखी युक्तिवाद आयोगासमोर सादर केला. तर ५ च्या पूर्वी शिंदे गटानेही आयोगासमोर लेखी युक्तिवाद सादर केला. मात्र ठाकरे गटाची २३ लाख कागदपत्रे बाद करण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने मोठी चाल खेळली आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या लेखी युक्तिवादात प्रतिनिधी सभेतील १९९ लोक आणि ११ राज्यांचे प्रमुख शिंदे गटाकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. २०१८ च्या घटना दुरुस्तीत उद्धव ठाकरेंनी अधिकार एकाधिकारशाहीने घेतल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण जो पक्षाची मूळ ओळख आहे यासाठी दोन्ही गटात लढाई सुरू आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही असा पवित्रा शिंदे-ठाकरे गटाने घेतला आहे. 

लेखी युक्तिवादाचा शेवटचा दिवस असताना ठाकरे गटाकडून ११२ पानांचा तर शिंदे गटाकडून १२४ पानांचा युक्तिवाद मांडण्यात आला. ठाकरे गटाने घटनेच्या १० व्या शेड्युल्डनुसार शिंदे गटाने स्वच्छेने पक्ष सोडल्याचं सिद्ध होतंय. त्यात शिवसेनेत पक्षांतर फूट नाही. हा गट पक्ष सोडून गेलाय. ते आमच्या चिन्हावर दावा करू शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांची याचिका ऐकून घेऊ नये या आधारावर युक्तिवाद मांडला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर २३ लाख कागदपत्रे सादर केलीत हे शिंदे गटासमोर आव्हान होते. त्यात शिंदे गटाची कागदपत्रे अवघे साडे चार लाख आहेत. 

त्यामुळे शिंदे गटाने चाल खेळत म्हटलंय की, १९९९ मध्ये लोकशाही मुल्यांना धरून पक्षप्रमुखाच्या अधिकारात काही बदल करण्यात आले होते. मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर जो बदल झाला त्या निवडी लोकशाही मुल्यांना धरून झाल्या नाहीत. त्यामुळे हे संघटनात्मक पक्षावर वर्चस्व असल्याचा दावा करत असले तरी हा दावा गृहितच धरू नये कारण या निवडी लोकशाहीनुसार झाल्या नाहीत असा युक्तिवाद शिंदे गटाने आयोगासमोर मांडून ही २३ लाख कागदपत्रे बघण्याची गरजच नाही हे शिंदे गट निवडणूक आयोगाला समजवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

शिंदे गटाचा दावा ४० नेते, ६ उपनेते, १३ खासदार, ४० आमदार, ४९ जिल्हाप्रमुख, ८७ विभागप्रमुख असे प्रतिनिधी सभेतील लोक हे आमच्या बाजूने आहेत असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर केला आहे.  त्यामुळे निवडणूक आयोग दोन्ही बाजूचे दावे-प्रतिदावे तपासून पाहिल त्यानंतर धनुष्यबाणाचा निर्णय देईल हे स्पष्ट झाले आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना