शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कोकण वगळता सर्वत्र होऊ शकतात जूनमध्येच निवडणुका, जुलैत मात्र अशक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 06:20 IST

पावसाच्या जिल्हानिहाय आकडेवारीचा विचार करता, कोकण वगळता राज्यात सर्वत्र जूनमध्ये निवडणुका घेणे शक्य आहे.

नितीन चौधरी, लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ज्या भागांत पावसाचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पावसाच्या जिल्हानिहाय आकडेवारीचा विचार करता, कोकण वगळता राज्यात सर्वत्र जूनमध्ये निवडणुका घेणे शक्य आहे. जुलैमध्ये मात्र, निवडणुका घेणे शक्य होणार नाही, असे दिसते.

पावसामुळे जूनमध्ये निवडणुका घेणे शक्य नाही, या राज्य निवडणूक आयोगाच्या दाव्याला  गेल्या पाच वर्षांच्या पावसाच्या आकडेवारीने खोटे ठरविले आहे. कोकणव्यतिरिक्त उर्वरित राज्यात जूनमध्ये पावसाचे सरासरी दिवस १५ पेक्षा कमी असल्याचे आकड्यांवरून दिसते. यंदा मान्सून सहा ते सात दिवस लवकर येणार असला तरी जूनमध्ये त्याचे प्रमाण सरासरीइतकेच असेल, असा अंदाज आहे. राज्य निवडणूक आयोगाने खरेच इच्छाशक्ती दाखविल्यास राज्यात निवडणुका होऊ शकतात. जुलैत बहुतांश राज्यात पावसाचे प्रमाण २० ते २५ दिवस असल्याचे दिसते. त्यामुळे जुलैत निवडणुकांसाठी वातावरण योग्य नाही.

आकडेच बोलतात...

कृषी खात्याच्या सांख्यिकी विभागाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीच्या आधारे हा निष्कर्ष निघाला आहे. त्यानुसार जूनमध्ये कोकणात गेल्या पाच वर्षांत २०१९ वगळता चारही वर्षांत सरासरी २५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाऊस झाला आहे. त्यामुळे जूनमध्ये कोकणात निवडणुका घेता येणे शक्य नाही. 

उर्वरित राज्यात २०२० व २०२१ वगळता इतर तीन वर्षांत सरासरी पावसाचे दिवस हे ७ ते १५ इतके आहेत. तर २०२० व २०२१ मध्ये हे दिवस पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भात १५ ते १८ इतके आहेत. त्यामुळे येथेही निवडणुका घेणे शक्य असल्याचे दिसते.

- जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र चांगला पाऊस असल्याचे दिसते. कोकणात संपूर्ण महिना पाऊस पडत असतो. पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांत हे प्रमाण सरासरी २० ते २५ दिवस इतके आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात हा पाऊस १५ ते २२ दिवस इतका पडल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी या महिन्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही. 

- ऑगस्ट महिन्यातही कोकणात पूर्ण महिनाभर पाऊस पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. उर्वरित भागात २०२० चा अपवाद वगळता पावसाचे प्रमाण ७ ते १५ दिवस आहे. हीच परिस्थिती साधारण सप्टेंबरमध्येही दिसून येते.

यापूर्वी निवडणुका इतक्या लांबल्याचे दिसत नाही. मात्र, जूनमध्ये निवडणुका झाल्याचे आठवत नाही.  हवामानाच्या अंदाजावर राज्य निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो. - जे. एस. सहारिया, माजी निवडणूक आयुक्त

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या पहिल्या टप्प्याच्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचे वितरण समान असेल. यंदा मान्सून सहा ते सात दिवस लवकर येण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या टप्प्याच्या अंदाजात चित्र आणखी स्पष्ट होईल. - डॉ. कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान खाते

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtraमहाराष्ट्र