शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

२०८ नगरपालिकांत मेमध्ये निवडणुका? एप्रिलमध्ये तारखा जाहीर होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 13:37 IST

नागरिकांनी दिलेल्या हरकती व सूचनांवर संबंधित जिल्हाधिकारी सुनावणी घेतील आणि त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे देतील व त्या आधारे आयोग प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देईल. १० मार्च ते १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना देता येतील.

मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या वा लवकरच मुदत संपणार असलेल्या २०८ नगरपालिकांमध्ये निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचालींना आता वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा जो कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला तो लक्षात घेता एप्रिलच्या दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची तारीख जाहीर होईल व निवडणूक मे मध्ये होईल, अशी शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील नगरपालिकांचा त्यात समावेश आहे.  मे २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपत असलेल्या अ वर्गातील एकूण १६, मे २०२० ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान मुदत संपत असलेल्या ६७ आणि ९ मार्च २०२२ रोजी मुदत संपत असलेली एक अशा ब वर्गातील ६८ आणि एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान मुदत संपत असलेल्या क वर्गातील १२० तसेच नवनिर्मित चार नगर परिषदांतील निवडणुका नजीकच्या काळात होऊ घातल्या आहेत.  नागरिकांनी दिलेल्या हरकती व सूचनांवर संबंधित जिल्हाधिकारी सुनावणी घेतील आणि त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे देतील व त्या आधारे आयोग प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देईल. १० मार्च ते १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना देता येतील. त्यावर जिल्हाधिकारी २२ मार्च रोजी सुनावणी देतील. २५ मार्चपर्यंत आयोगाला अहवाल देतील. १ एप्रिलपर्यंत आयोग अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देईल. त्याच सुमारास अनुसूचित जाती, जमाती आणि महिला आरक्षण जाहीर केले जाईल. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 

प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर निवडणूक आयोग विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या आधारे प्रभागांची मतदार रचना जाहीर करेल व त्यावर हरकती व सूचना मागविल्या जातील. ही प्रक्रिया साधारणत: १८ ते २० एप्रिलदरम्यान पूर्ण होईल व त्यानंतर आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल. हा संपूर्ण कार्यक्रम लक्षात घेता २०८ नगरपालिकांची निवडणूक मे मध्ये होईल, असे चिन्ह आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२२Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका