शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

महापालिका निवडणुकीचे बिगुल

By admin | Updated: August 23, 2016 06:49 IST

राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आरक्षणाची सोडत जाहीर होताच रणधुमाळीला सुरुवात होईल.

मुंबई : राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आरक्षणाची सोडत जाहीर होताच रणधुमाळीला सुरुवात होईल. उल्हासनगर महापालिकेसाठी ३० सप्टेंबर, बृहन्मुंबई महापालिकेसाठी ३ आॅक्टोबर; तर उर्वरित ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ आॅक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल. त्यानंतर प्रभाग रचना व आरक्षणाबाबत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी केली आहे.बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर या दहा महानगरपालिकांची मुदत मार्च/एप्रिल २०१७ मध्ये संपत आहे. तत्पूर्वी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेस २३ सप्टेंबर २०१६ पर्यंत मान्यता देण्यात येईल. त्यानंतर संबंधित तारखांना महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाबाबत सोडत काढण्यात येईल. आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत बृहन्मुंबईसाठी ५ ते २० आॅक्टोबर; तर उर्वरित महापालिकांसाठी १० ते २५ आॅक्टोबर या कालावधीत संबंधित महापालिकेत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यावर राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी ४ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी देतील. (विशेष प्रतिनिधी)> मुंबईत एक सदस्यीय प्रभाग रचनाबृहन्मुंबई महापालिकेची सदस्य संख्या २२७ एवढी निश्चित केली आहे. उर्वरित महापालिकांसाठी २०११च्या लोकसंख्येच्या आधारे सदस्यसंख्या निश्चित केली जाईल. त्यानंतर प्रभाग रचना करण्यात येईल. बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग रचना एकसदस्यीय; तर अन्य सर्व महापालिकांची प्रभाग रचना बहुसदस्यीय पद्धतीने केली जाईल.बृहन्मुंबई महापालिकेसाठी ५ नोव्हेंबरपर्यंत हरकतींवर सुनावणी देण्यात येईल. २२ नोव्हेंबरला मुंबईची; तर उर्वरित महापालिकांची अंतिम प्रभाग रचना २५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेस २३ सप्टेंबर २०१६पर्यंत मान्यता देण्यात येईल.