निवडणूक आयोगाने सरळ जागांचा लिलाव करावा - आम आदमी पक्ष

By admin | Published: March 14, 2017 08:40 AM2017-03-14T08:40:58+5:302017-03-14T08:40:58+5:30

आम आदमी पक्षाचे गोवा युनिट समन्वयक एल्विस गोम्स यांनी निवडणूक आयोगाने यापुढे निवडणूक घेण्यापेक्षा सरळ जागांचा लिलाव करावा अशी टीका केली आहे

Election Commission should auction the seats straight - Aam Aadmi Party | निवडणूक आयोगाने सरळ जागांचा लिलाव करावा - आम आदमी पक्ष

निवडणूक आयोगाने सरळ जागांचा लिलाव करावा - आम आदमी पक्ष

Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 14 - आम आदमी पक्षाचे गोवा युनिट समन्वयक एल्विस गोम्स यांनी निवडणूक आयोगाने यापुढे निवडणूक घेण्यापेक्षा सरळ जागांचा लिलाव करावा अशी टीका केली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना एल्विस गोम्स यांनी गोवा युनिट बरखास्त करण्यात येत असल्याच्या बातम्या निराधार असल्याचंही सांगितलं आहे. पक्ष सिद्धांतावर आम्ही काम करत असल्याचं ते बोलले आहेत. 
 
गोवा विधानसभा निवडणुकीत झालेल्या दणदणीत पराभवानंतर एल्विस गोम्स यांची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. आम आदमी पक्ष साधी एकही जागा जिंकू शकलं नाही. 
 
एल्विस गोम्स यांनी सांगितलं की, 'निवडणूक आयोग अपयशी झाला असल्याने निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा वापरण्याचा प्रकार वाढला आहे. कधी कधी तर मला आश्चर्यच वाटतं की ही निवडणूक का घेतली जाते ?, निवडणूक आयोगाने जागांचा लिलाव केला तर जास्त उत्तम होईल. जो जास्त किंमत देईल त्याला ती जागा देऊन टाकावी. विनाकारण एवढा खर्च करुन निवडणूक घेण्याची गरज काय ?'.
 
लोकांना नेमकं काय हवं आहे, हे समजण्याच्या पलीकडे आहे असं एल्विस गोम्स बोलले आहेत. 'आम आदमी पक्षाने लोकांसमोर एक योग्य आणि चांगला पर्याय ठेवला होता. ज्यामधून नवे चेहरे समोर आणले होते. धार्मिक आणि जातीय फॉर्म्यूला दूर ठेवून स्वच्छ प्रतिमा असणा-यांना तिकीट दिलं होतं. लोकांना आता याहून अधिक काय हवं आहे, हे समजण्यापलीकडे आहे. लोकांना अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करु', असं एल्विस गोम्स बोलले आहेत.
 
 
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसले, तरी ४0 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस १७ जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. गेली पाच वर्षे राज्य केलेल्या भाजपाला जबरदस्त धक्का बसला. भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसह एकूण सहा मंत्री पराभूत झाले. या निवडणुकीत पाच माजी मुख्यमंत्री विजयी झाले, तर तिघा अपक्षांनी बाजी मारली. रोहन खंवटे यांनी सलग दुसऱ्यांदा पर्वरीतून अपक्ष जिंकून इतिहास घडवला.
 
आम्हाला पर्याय नाही. आम्ही महिलांसाठी प्रचंड योजना राबविल्या आहेत, संघटनात्मक बांधणी आमच्याकडेच आहे, अशा वल्गना करून २३ ते २६ जागा जिंकण्याचा दावा भाजपा नेते गेले वर्षभर करत होते. प्रत्येक मतदारसंघात भाजपाने प्रचंड पैसा निवडणुकीवेळी खर्च केला. हाती पोलीस यंत्रणादेखील होती. तरीसुद्धा मतदारांनी भाजपाला २१वरून १३ जागांपर्यंत खाली आणले. केंद्रात व गोव्यातही सत्ता असूनदेखील भाजपाचा पराभव झाला. याउलट पाच वर्षांपूर्वीच २०१२ सालच्या निवडणुकीत ज्या काँग्रेसला केवळ ९ जागा मिळाल्या होत्या, तो पक्ष या वेळी १७ मतदारसंघांमध्ये बाजी मारू शकला.
 
२०१२च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. या वेळी चर्चिल आलेमाव यांच्या रूपाने राष्ट्रवादीला एक जागा जिंकता आली. बाणावली मतदारसंघातून चर्चिल यांनी विधानसभेत पुनरागमन केले आहे.
२०१२ साली फोंड्यात पराभूत झालेले माजी मुख्यमंत्री रवी नाईक, २००७ साली नावेलीत पराभूत झालेले लुईझिन फालेरो यांचेही विधानसभेत आता पुनरागमन झाले आहे.रवी, फालेरो, प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत व चर्चिल आलेमाव हे पाचही माजी मुख्यमंत्री जिंकले.
 
गोव्यावर राज्य करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आम आदमी पक्षाला खातेही खोलता आले नाही. सर्व मतदारसंघांमध्ये ‘आप’चा दारुण पराभव झाला. नव्यानेच स्थापन झालेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने चार जागा लढविल्या होत्या. त्यापैकी तीन जागा मिळवून या पक्षाने मोठे यश मिळविले. गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांनी भाजपाच्या दोघा ज्येष्ठ मंत्र्यांचा दणदणीत पराभव केला. भाजपाशी युती तोडून बंडखोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी व शिवसेनेशी युती केलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या वाट्याला अपेक्षाभंग आला. आपल्याला किमान ८ जागा मिळतील, असा दावा करणाऱ्या मगोपला केवळ तीनच मतदारसंघ जिंकता आले. त्यातही मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचा पराभव झाला.
 

Web Title: Election Commission should auction the seats straight - Aam Aadmi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.