शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, मतदान केंद्रांवर नोंदणीसाठी शिबिरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 13:42 IST

मतदार नोंदणीबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर २९ ऑगस्टपर्यंत आयोगाकडून निर्णय घेण्यात येणार आहे.  ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

मुंबई : राज्यातील मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन निवडणूक आयोगाकडून केले आहे. १०, ११, १७, १८ ऑगस्ट रोजी शिबिरे होतील. मतदारांची नावे गहाळ झाल्यावरून राजकीय पक्षांनी टीकेचे लक्ष्य केल्यानंतर आयोग ॲक्शन मोडवर आला आहे. 

मतदार नोंदणीबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर २९ ऑगस्टपर्यंत आयोगाकडून निर्णय घेण्यात येणार आहे.  ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ६ ऑगस्ट रोजी मतदार प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.  १ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले मतदार होऊ शकतात. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी करता येते. मतदारांचे छायाचित्र नाही म्हणून त्यांची नावे मतदार याद्यांमधून लोकसभा निवडणुकीपूर्वी रद्द करण्यात आली, असा आरोप करण्यात आला होता. आता आयोगाने या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन मतदार याद्या, आयोगाच्या नियमानुसार छायाचित्र घेऊन मतदार यादीत सुधारणा करणे तसेच अस्पष्ट छायाचित्र बदलून चांगले छायाचित्र मतदारांकडून घेऊन आधीचे बदलण्याचे काम सुरू आहे. 

नाव प्रारूप मतदार यादीमध्ये तपासाप्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे तुम्हाला घरबसल्या बघता येते. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही यादी डाऊनलोड करून तसेच www.voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून अथवा वोटर हेल्पलाइन या मोबाइल ॲपचा वापर करून मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे बघता येईल.  

आयोगाने ६ ते २० ऑगस्टदरम्यान एक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार या कालावधीत नागरिकांना नवीन मतदार नोंदणी करणे, मतदारांची नावे, पत्ते आणि अन्य तपशिलात दुरुस्ती करवून घेण्याची संधी आहे.- डॉ. किरण कुळकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, निवडणूक आयोग.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभा