शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 14:26 IST

भारतीय निवडणूक आयोगाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.

Graduates and Teachers Constituencies Election : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने मुंबई आणि कोकण विभागात शिक्षक, पदवीधर मतदार संघांची निवडणूक जाहीर केली आहे.  चार जागांवरील आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर यासोबत मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. १० जून रोजी ही निवडणूक होणार असून १५ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ मे असणार आहे. तर १३ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघ-

 गेल्या निवडणुकीत मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस हे निवडून आले होते. त्यावेळी एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. विलास पोतनीस यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपणार आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघ-

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात प्रमुख लढत झाली होती. त्यावेळी निरंजन डावखरे यांनी ही निवडणूक जिंकली.

 मुंबई शिक्षक मतदारसंघ-

मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे आमदार कपिल पाटील, भाजप पुरस्कृत अनिल देशमुख आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यासह एकूण १० उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यावेळी कपिल पाटील हे निवडून आले होते.

नाशिक शिक्षक मतदारसंघ-

नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, आघाडी पुरस्कृत संदीप बेंडसे, भाऊसाहेब कचरे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत किशोर दराडे यांनी बाजी मारली होती. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtraमहाराष्ट्र