शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

एकनाथ शिंदेंचे पंख छाटले

By admin | Updated: July 5, 2015 02:11 IST

मुंबईच्या सागरीकिनाऱ्यावर जलवाहतूक सुरू करण्याचे महाराष्ट्र रस्ते विकास मंडळास दिलेले अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने काढून घेतले आहेत.

नारायण जाधव, ठाणे मुंबईच्या सागरीकिनाऱ्यावर जलवाहतूक सुरू करण्याचे महाराष्ट्र रस्ते विकास मंडळास दिलेले अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने काढून घेतले आहेत. हे अधिकार त्यांच्याकडील गृह खात्याच्या अखत्यारीतील महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डास प्रदान करण्यात आले आहेत. भाजपाने राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेला बिनमहत्त्वाची खाती देऊन बोळवण केली असतानाच कामे होत नसल्याने मंत्रिमंडळ बैठकीत मौन बाळगणे, दांडी मारणे, अशी आयुधे वापरणारे शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांना या निर्णयाद्वारे मुख्यमंत्र्यांनी दणका दिला आहे.राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यांसह शासनाच्या महत्त्वाच्या वास्तू बांधण्याचे अधिकार तसे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहेत. रस्ते विकास महामंडळ नावालाच असून, नितीन गडकरी यांच्या कारकिर्दीनंतर ते भकास झाले आहे. अशा बिनमहत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. या खात्याकडे कामेच नसल्याने शिंदे आधीच नाराज आहेत. त्यांची ही नाराजी कधीच लपून राहिलेली नाही. त्यातच कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करणाऱ्या २७ गावांच्या प्रश्नासह ठाणे जिल्ह्यातील क्लस्टर व इतर पायाभूत सुविधांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी कायम सापत्न वागणूक दिल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. मात्र त्याही पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्या खात्याकडे असलेल्या मुंबईच्या पूर्व-पश्चिम किनाऱ्यांवरील जलवाहतूक प्रकल्पांचे काम गेल्या आठवड्यात काढून घेतले आहे. नजीकच्या भविष्यात मोनो-मेट्रो रेल्वे, एलिव्हेटेड रेल्वेसह मुंबईच्या वाहतूक क्षेत्रात क्रांती करणारा प्रकल्प म्हणून जलवाहतुकीकडे पाहिले जात होते. तिच्या अंमलबजावणीसाठी शासनाने ६ मार्च २०१२ रोजी रस्ते विकास मंडळाची नोडल एजन्सी म्हणून निवड केली होती. यात मुंबई ते नवी मुंबई, मुंबई-ठाणे-वसईसह मुंबईतील बांद्रे-गेट वे आॅफ इंडिया अशा जलवाहतूक प्रकल्पांचा समावेश होता. रस्ते विकास मंडळाने याबाबतीत तांत्रिक तयारी पूर्ण करून काही मार्गांवरील जलवाहतुकीच्या निविदाही मागविल्या होत्या. मात्र आता तांत्रिक कुशलता आणि जलवाहतूक प्रकल्प राबविण्यास रस्ते विकास मंडळापेक्षा मेरिटाइम बोर्डाची अर्हता/क्षमता जास्त असल्याचा साक्षात्कार गृह खात्यास झाला आहे. हा अनुभव आणि पात्रता लक्षात घेऊनच रस्ते विकास महामंडळाकडून जलवाहतूक अंमलबजावणीचे अधिकार काढून ते मेरिटाइम बोर्डाकडे देण्यात येत असल्याचे गृह खात्याने म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर मेरिटाइम बोर्डाने तत्काळ या आदेशाची अंमलबजावणी करून प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करून तांत्रिक व आर्थिक आराखडा निश्चित करून त्याचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. का दिले मेरिटाइम बोर्डास अधिकार ?मेरिटाइम बोर्डातील सागरी अभियंता विभाग हा इनलॅण्ड व्हेसल्स अ‍ॅक्ट १९९७ अंतर्गत जलवाहतुकीसाठी नवीन जलयान बांधणी आणि अस्तित्वात असलेली जलयाने वापरायोग्य आहेत, याचे प्रमाणपत्र देण्यात माहीर आहे. जलमार्गातील गाळ उपसणे, सुरक्षित नौकानयनासाठी बोया टाकणे, दीपस्तंभ उभारणे, वादळसूचक बावटे लावणे, यात सतर्क आहे. तसेच मेरिटाइम बोर्डाकडे स्वतंत्र स्थापत्य अभियांत्रिकी पथक असून ते जलवाहतुकीच्या ठिकाणी जेट्टी, टर्मिनल इमारत, प्रवासी शेड, जोडरस्ता या पायाभूत सुविधांच्या निर्मितीत मेरिटाइम बोर्ड हे रस्ते विकास महामंडळापेक्षा आघाडीवर आहे.मेरिटाइम बोर्डाकडे आधुनिक सामग्रीने युक्त अशी तीन जलआलेखन सर्वेक्षण पथके असून, त्यांना किनारपट्टीसह नद्या आणि खाड्यांमध्ये जलआलेखन करून त्यांचे नकाशे तयार करण्याचा अनुभव आहे.1.80कोटी प्रवासी किनारपट्टीवरील जलमार्गांवर दरवर्षी जलवाहतूक सेवांचा वापर करतात. त्या सर्वांना ही सेवा पुरविण्याचा अनुभव मेरिटाइम बोर्डास आहे.या निर्णयामुळे रस्ते विकास मंडळाने जलवाहतुकीसाठी केलेली तयारी अरबी समुद्रात बुडणार आहे, तर मेरिटाइम बोर्डाला नव्याने सर्व तयारी करावी लागणार असल्याने मुंबईकरांचे जलवाहतुकीचे स्वप्न आणखी काही दिवस लांबणीवर पडणार आहे. रस्ते विकास मंडळाने जलवाहतुकीसाठी जी तयारी केली होती, जो खर्च केला होता, त्याचे काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.