शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde's Dasara Melava: शिंदेंचा दसरा मेळावा! राज्यभरातून १० हजार बसेस मुंबईत येणार, ट्रेनही बुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 18:22 IST

Eknath Shinde's Dasara Melava: एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य़कर्ते मुंबईत येणार असल्याने त्यांच्या राहण्याच्या, जेवण्याच्या सोईसाठी मुंबईतील मोठमोठे हॉल, हॉटेल बुक केली जात आहेत.

दसरा मेळावा कुठे होणार यावरून अद्याप निर्णय झालेला नसताना शिवसेना नेमकी कोणाची याचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी तयारी करत आहेत. यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी जवळपास पाच लाखांवर लोक जमा करण्याची जबाबदारी त्यांनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांवर सोपविली आहे. 

यामुळे राज्यभरातून १० हजार बसेस मुंबईत येण्याची शक्यता आहे. विशेष ट्रेनदेखील बुक करण्यात येत आहेत. राज्यभरातील चाळीस आमदार आपलेच दोन ते तीन हजार कार्यकर्ते गोळा करणार आहेत. याशिवाय जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी टार्गेट देण्यात आली आहेत.  

जळगावमध्ये तीन ट्रेन बुक करण्यात आल्या आहेत. यासाठी आगाऊ दोन लाख रुपये प्रत्येक ट्रेनसाठी दिले आहेत. तसेच नाशिकमध्ये देखील शिवसेनेची बैठक सुरु आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या सभेची गर्दी नाही तर जनसंघाच्या सभेच्या गर्दीचा विक्रम मोडण्याची तयारी सुरु आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य़कर्ते मुंबईत येणार असल्याने त्यांच्या राहण्याच्या, जेवण्याच्या सोईसाठी मुंबईतील मोठमोठे हॉल, हॉटेल बुक केली जात आहेत. त्यांच्या मदतीसाठी कार्यकर्ते तयार केले जात आहेत. एवढ्या लोकांचे नियोजन करण्यासाठी खास लोकांवर शिंदे यांनी जबाबदारी सोपविली आहे. याबाबतची माहिती एबीपी माझाने दिली आहे. 

कशासाठी...शिंदे गटात जायचे की नाही, अशा काठावर शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. यामुळे असे शक्तीप्रदर्शन केले तर त्याचाफायदा होईल आणि गटात पुन्हा इनकमिंग सुरु होईल, अशी रणनिती असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यामुळे ठाकरेंच्या शिवसेना पक्षात जे काही कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत आहेत, त्यांना फोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDasaraदसराShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे