शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पार्कवर शिंदेंचाच दसरा मेळावा व्हावा, रामदास आठवले यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:36 IST

आठवले म्हणाले की, भाजप-मनसे युती झाल्यास आपला विरोध कायम आहे. व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटण्यास काही हरकत नाही.

कल्याण: खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे. त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतोय, त्यामुळे शिवाजी पार्कवर शिंदे यांचाच दसरा मेळावा व्हायला पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर कुठे मेळावा घ्यायला हरकत नाही, असे ते म्हणाले.

आठवले म्हणाले की, भाजप-मनसे युती झाल्यास आपला विरोध कायम आहे. व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटण्यास काही हरकत नाही. मात्र, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. रिपब्लिकन पक्ष व एकनाथ शिंदेंचा गट भाजप सोबत आहे. मागच्या वेळेला भाजप आणि आरपीआय एकत्र असताना मुंबईत ८२ जागा निवडून आणल्या होत्या. यंदा ११४ जागा निवडून येण्यात काही अडचण येणार नाही. राज ठाकरेंना घेतले तर भाजपचे नुकसान होऊ शकते, उत्तर भारतीय, गुजराती, दक्षिण भारतीय समाजाची मते  मिळणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेEknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरे