शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आमदारांसह ठाण्यात; शक्ती स्थळावर जोरदार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 22:40 IST

बहुमत आमच्याकडे आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले आहे. यापुढील वाटचाल बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि त्यांचे विचार आणि विकासाचचे हिंदुत्व त्यानुसार राज्य सरकार या राज्याचा विकास करेल असा विश्वास त्यानी व्यकय केला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : तब्बल १५ दिवसांनी ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी शक्ती स्थळावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंद नगर चेक नाक्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत झाल्यानंतर  आपल्या ५० समर्थक आमदारांसह ते थेट आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर दाखल झाले. स्वर्गीय आनंद दिघे यांना अभिवादन करून हे सरकार हिंदुत्तवाचा विचार पुढे नेऊन सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचे कामकरेल असा विश्वास त्यांनी यावेळी पुन्हा एकदा व्यक्त केला. 

 मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच ठाण्यात आले. एकनाथ शिंदे हे दुपारी ४ पर्यंत ठाण्यात येतील यासाठी २ वाजल्यापासून एकनाथ शिंदे समर्थकांनी आनंद नगर चेक नाका आणि आनंद आश्रमात गर्दी केली होती. शहरात ठिकाणी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. संध्याकाळी ९.३० च्या सुमारास ५० आमदारांसह शक्ती स्थळावर दाखल झाले. एक मोठी बस आणि एकनाथ शिंदे यांचा ताफा शक्तीस्थळावर दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आला. यावेळी जोरदार घोसनबाजी करत त्यांचे स्वगत करण्यात आले, यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. एकनाथ लोकनाथ या गाण्याचा गजर यावेळी करण्यात आला. जय भवानी जय शिवाजी, एकनाथ शिंदे आगे बढो अशा घोषणा दिल्या.

 बहुमत आमच्याकडे आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले आहे. यापुढील वाटचाल बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि त्यांचे विचार आणि विकासाचचे हिंदुत्व त्यानुसार राज्य सरकार या राज्याचा विकास करेल असा विश्वास त्यानी व्यकय केला. सर्वसामान्य घटकांचा, शोषित,वंचित, पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आमचं सरकार करेल, अनेक प्रकल्प आमचे सरकार करेल, राज्याचा विकास करण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर सहकारी यांना सोबत घेऊन युती सरकार भविष्याची वाटचाल करेल. हे गोरगरिबांच्या सर्वसामान्यांचे सरकार आहे, या सरकारमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलं जाईल असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना