शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: भाजपाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करणार का? एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 09:04 IST

Eknath Shinde: शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारल्यानंतर काल संपूर्ण दिवसभर मौन बाळगणारे एकनाथ शिंदे यांनी आज पहाटेपासून प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

गुवाहाटी - शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारल्यानंतर काल संपूर्ण दिवसभर मौन बाळगणारे एकनाथ शिंदे यांनी आज पहाटेपासून प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे आपल्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर भाजपाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्याबाबत शिंदे यांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. आज दुपारी तुम्ही राज्यपालांची भेट घेऊन भाजपाला पाठिंबा देणारं पत्र  राज्यपालांना देणार आहात का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले की, अद्याप असा कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्ही ४० प्लस आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व त्यांची भूमिका त्यांची विचारधारा सर्वसामान्य शिवसैनिकांची भूमिका आम्ही पुढे घेऊन जात आहोत. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही. धर्मवीर आनंद दिघेंनी दिलेली शिकवण, तसेच बाळासाहेबांचं हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि सामान्य जनतेची भावना घेऊन पुढे जात आहोत, असेही ते म्हणाले.  आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आज बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार एकत्र आलेलो आहोत. आम्ही कुणावरही कसलीही टीकाटिप्पणी केलेली नाही. त्यामुळे मी एकच सांगतो की, विकासाचं राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार आम्हाला पुढे न्यायचं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांच्या फोटोमध्ये तब्बल ३५ हून अधिक आमदार दिसत आहेत. तर आसाममध्ये पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांना आपल्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडी