शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 06:20 IST

१९व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन

नालासोपारा : राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देऊन महाराष्ट्र राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे. जगाला हेवा वाटावा,  असा विकसित महाराष्ट्र घडवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विरार येथे केले.

जागतिक मराठी अकादमी आणि विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, विरार यांच्या संयुक्त विद्यमाने व साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, वसई यांच्या सहकार्याने विवा महाविद्यालय येथे १९ वे जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी याचे उद्घाटन मुख्यमंत्री  शिंदे यांच्या हस्ते झाले.

कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त जगामध्ये कुठेही मराठी माणूस स्थायिक झाला असेल, तरी त्याची नाळ ही मराठी भाषा व महाराष्ट्राशी जोडलेली असते  याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपानमधील मराठी भाषिक आमदार योगेंद्र पुराणिक हे आहेत, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुराणिक यांचे अभिनंदन केले. यावर्षी देखील विश्व मराठी साहित्य संमेलन, वाशी येथे आयोजित करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

तुम्ही उद्योग उभारा, प्रगतीचे मार्ग माझ्या हातात - राणेसंमेलनाच्या पहिल्या सत्राला केंद्रीय मंत्री नारायण प्रमुख म्हणून उपस्थित होते. यावेळी आ. हितेंद्र ठाकूर यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंधांमुळेच आज संमेलनाला १० मिनिटे आधीच आलो.  जागतिक मराठी परिषदेने मराठी माणसाच्या प्रगतीची दिशा ठरवावी, नियोजन करावे. जपान, अमेरिका, चीन या देशांच्या तोडीने उभे राहण्यासाठी तंत्र आत्मसात करा आणि उद्योग उभारा, प्रगतीचे मार्ग माझ्या हातात आहेत, मी तुम्हाला सर्व सहकार्य करायला तयार आहे, असे राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे