शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंसमोर पुढचे पर्याय काय? पक्षांतरबंदी कायदा ठरणार महत्त्वाचा, अशा आहेत तरतुदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 08:40 IST

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे २० ते ३५ खासदार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडून वेगळा गट स्थापन केला तर त्यांच्यासमोर काय पर्याय असतील, याच्या काही शक्यता समोर आल्या आहे. 

मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने पाचवा आमदार निवडून आणला होता. या निवडणुकीत भाजपाच्या पाच उमेदवारांना पहिल्या पसंतीची १३३ मते मिळाल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, या निकालाला काही तास उलटत नाहीत तोच शिवसेनेचे बडे नेते आमदारांसह सूरतमध्ये निघून गेल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे २० ते ३५ आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंनीशिवसेना सोडून वेगळा गट स्थापन केला तर त्यांच्यासमोर काय पर्याय असतील, याच्या काही शक्यता समोर आल्या आहे. 

कुठल्याही आमदाराने पक्षाविरोधात बंडखोरी केल्यास त्याच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. तसेच त्याची आमदारकी रद्द होऊ शकते. मात्र जर एखाद्या पक्षाच्या सभागृहातील एकूण सदस्य संख्येपेक्षा दोन तृतियांशहून अधिक सदस्यांनी पक्षांतर केल्यास किंवा त्या सदस्यांनी वेगळा गट स्थापन केल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही. सध्या शिवसेनेचे विधानसभेच ५५ आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदें यांनी किमान ३६ ते ३७ आमदारांचा गट बनवल्यास त्यांचं सदस्यत्व कायम राहील. तसेच शिवसेनेचा वेगळा गट म्हणून त्यांना मान्यताही मिळेल.

तर एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतियांशपेक्षा कमी आमदारांचं समर्थन असेल तर त्यांच्यावर पक्षांतरबंदीचा कायदा लागू होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि त्यांच्याकडे असलेल्या समर्थक आमदारांकडे राजीनामा देऊन नव्याने निवडणूक लढवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. 

पक्षांतर बंदी कायदा काय आहे? १९८५ मध्ये ५२ व्या घटनादुरुस्ती अन्वये पक्षांतरबंदीचा कायदा लागू करण्यात आला होता. त्यानुसार यामध्ये १०वे परिशिष्ट्य समाविष्ट करण्यात आले होते. त्यानुसार  कलम १०२ आणि १९१ या आमदार, खासदारांना अपात्र ठरवणाऱ्या अनुच्छेदांमध्ये बदल करण्यात आला. या सर्व तरतुदींना पक्षांतरबंदी कायदा म्हणून ओळखले गेले. दरम्यान, या कायद्यातील सभापतींच्या आदेशाला कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही ही तरतून कोर्टाने रद्द केली होती.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा