शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांना 'स्किझोफ्रेनिया' आजार?; विजय शिवतारेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:43 IST

ज्यांनी १५ वर्ष मतदारसंघ बांधला त्यांना दुसऱ्या मतदारसंघातून लढा असा निरोप दिला जातो हा काय प्रकार आहे असा संतप्त सवाल विजय शिवतारेंनी उपस्थित केला.

पुणे - शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतारे यांचं शिवसेना सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हकालपट्टी काय मी स्वत: पत्रकार परिषद घेत माझी भूमिका स्पष्ट केली आहे असंही शिवतारे म्हणाले. 

विजय शिवतारे यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली नाही. ते मुख्यमंत्री असताना अनेक मागण्यांचे पत्र मी लिहिली. त्यावर काहीच निर्णय झाला नाही. उत्तरही दिले नाही. ज्यांनी १५ वर्ष मतदारसंघ बांधला त्यांना दुसऱ्या मतदारसंघातून लढा असा निरोप दिला जातो हा काय प्रकार आहे. संजय राऊतांची निष्ठा कुणाशी आहे हे जनतेला माहिती आहे. जे महाराष्ट्राला कळतं ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना का कळत नाही? असा सवालही शिवतारेंनी विचारला. 

त्याचसोबत राऊत यांना स्किझोफ्रेनिया आजार झाला असावा. राऊतांना आपल्यालाच सगळं कळतं असा भास होतो. ते आपल्याच विचारांच्या गर्तेत असतात. मेडिकल टर्ममध्ये सिझोफ्रेनिया आजार आहे. या आजाराच्या माणसाला काहीच प्रॉब्लेम नसतो. हुशार माणसाला हा आजार होतो. ही माणसं अतिविचाराच्या गर्तेत जातात. त्यातून त्यांना वेगवेगळे भास होतात. गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही हा भास राऊतांना झाला. आदित्य ठाकरेंना घेऊन गेले आणि तिथे तमाशा झाला. नोटापेक्षाही कमी मते शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाली. हिंदुत्वाच्या मुद्दयावर योगी सरकारला आव्हान देण्यासाठी गेले त्याठिकाणी १३९ उमेदवार उभे केले. सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले. दिल्ली काबीज करू आणि उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करू म्हणतात हा तिसरा भास आहे. चुकीच्या प्रकारे विधाने करून ते बिंबवतात. त्यामुळे राऊतांना हा आजार जडलाय का? असा प्रश्न उभा राहतो असा खोचक टोला शिवतारेंनी लगावला. 

टॅग्स :Vijay Shivtareविजय शिवतारेSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना