शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Shivsena Dasara Melava: शिंदे गटाचे कार्यकर्ते मुंबईला येत असताना तीन मोठ्या घटना; वाहनांचा अपघात, हृदयविकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 16:26 IST

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Dasara Melava Shivsena: शिंदे गटाने मोठ्या प्रमाणावर बस, कार आणि रेल्वेचे बुकिंग करण्यात आले होते. यानुसार कालपासून राज्यभरातील गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या होत्या.

शिवसेना कोणाची, याचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने राज्यभरातून कार्यकर्त्यांना मुंबईत पाचारण केले आहे. सुमारे पाच लाख कार्यकर्ते बीकेसीमधील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जमा होणार आहेत. परंतू, मुंबईला येत असताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत अपघात, मृत्यू, मारहाणीसारखे प्रकार घडले आहेत. 

शिंदे गटाने मोठ्या प्रमाणावर बस, कार आणि रेल्वेचे बुकिंग करण्यात आले होते. यानुसार कालपासून राज्यभरातील गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. यावेळी शिंदे गटाची वाहने जाण्यासाठी लोकांसाठी बंद असलेला समृद्धी महामार्ग खुला करण्यात आला होता. यावेळी अर्जुन खोतकरांच्या ताफ्याने शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मंगळवारी शिंदे गटाचे कार्यकर्ते मुंबईला येत असताना त्यांच्या ताफ्यातील सात ते आठ गाड्या एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला होता. समृद्धी महामार्ग खुला करण्यावर शिंदे गटाने ही महामार्गाची ट्रायल असल्याचे हास्यास्पद उत्तर दिले होते. 

दुसरीकडे आज सकाळी य़वतमाळहून मुंबईकडे निघालेल्या शिंदे समर्थक कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. श्रीकृष्ण मांजरे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. 

तर आज आणखी एक धक्कादायक घटना घडली असून नाशिकमध्ये शिवसेनेचे दोन गटांचा रस्त्यावरच मुंबईकडे येत असताना राडा झाल्याचे पहायला मिळाले आहे.  शिवसेना आणि शिंदे गटामध्ये नाशिकमध्ये वादाची ठिकणी पडली आहे. महिलांची छेड काढल्याचा दावा करत शिवसेनेच्या रणरागिणींनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.  या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. नाशिकमधून शिंदे गटाचे शिवसैनिक मुंबईकडे येत असताना त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना डिवचले. यावेळी शिंदे गटातील शिवसैनिकांपैकी काही शिवसैनिकांनी महिलांकडे पाहून काही हातवारे केल्याचा आरोप महिला शिवसैनिकांनी केला.

 त्यानंतर शिवसैनिकांनी गाड्या अडवून शिंदेगटातील शिवसैनिकांशी वाद घातला. तसेच या कार्यकर्त्यांना गाडीबाहेर खेचून त्यांना मारहाण केली. या घटनेचे चित्रिकरणही करण्यात आले असून, त्यामध्ये गाडीतील शिवसैनिक या महिला शिवसैनिकांची माफी मागताना दिसत आहेत. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे