शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे बंड: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 16:35 IST

एकनाथ शिंदे प्रकरणात भाजपाचा हात असल्याचा शिवसेनेचा दावा

Eknath Shinde Devendra Fadnavis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडण्याची वेळ आली. माझे शिवसैनिक मला भेटून माझ्यासमोर सांगत असतील की मी मुख्यमंत्री म्हणून नालायक आहे तर मी मुख्यमंत्रीपदही सोडायला तयार आहे, अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटाला घातली. या प्रकारानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत, शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. या साऱ्या घडामोडींनंतर संजय राऊत यांनी एक घोषणा केली. बंडखोर आमदारांनी मुंबईत येऊन चर्चा केल्यास शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करेल असे ते म्हणाले. या साऱ्या गोंधळात भाजपाचे महत्त्वाचे नेते कुठे आहेत अशी चर्चा रंगली आहे. याच दरम्यान, भाजपाचे नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठं विधान केले.

"महाराष्ट्रातील घडामोडींवर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील नेत्यांचे बारीक लक्ष आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे महत्त्वाचे नेतेमंडळी देखील या घडामोडींवर नजर ठेवून आहेत. मी याबद्दल आतातरी  काही बोलणार नाही. या साऱ्या घटना पाहता महाराष्ट्राच्या हिताचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय  देवेंद्र फडणवीस घेतील. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचे जे निर्णय असतील ते निर्णय घेण्यास ते समर्थ आहेत", असे प्रमोद सामंत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतू या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे. परंतु आमदारांनी २४ तासांत मुंबईत परत यावे, तिथे बसून पत्रे पाठवत बसू नये, असे संजय राऊत म्हणाले. मी अधिकृतपणे ही भूमिका मांडतोय, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेPramod Sawantप्रमोद सावंतSanjay Rautसंजय राऊत