शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

ShivSena: शिवसेना आमदार नितीन देशमुख सूरतच्या हॉस्पिटलमध्ये दाखल, एकनाथ शिंदेंसोबत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 13:10 IST

छातीत दुखू लागल्याने अकोल्यातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना पहाटे सूरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मुंबई: काल झालेल्या विधान परिषद निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जवळपास 25 आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याची चर्चा आहे. मीडियामध्ये विविध आमदारांची नावेही येत आहेत. 

नितीन देशमुख रुग्णालयातसकाळपासून माध्यमांमध्ये येत असलेल्या शिवसेनेच्या आमदार यादीत अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचेही नाव होते. आता मिळालेल्या नवीन माहितीनुसार, नितीन देशमुख यांना पहाटे गंभीरावस्थेत सूरतमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने रुग्णालयातील विशेष कक्ष क्रमांक 15 मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या वॉर्डबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवलाएकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे ठाण्यातील अनेक कट्टर समर्थक आणि नगरसेवक हेदेखील नॉट रिचेबल असून सर्व नेते पदाधिकारी  शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शिंदे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाची तुकडीदेखील शिंदे यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आली आहे. 

'...तर सत्ता स्थापन करू'-चंद्रकांत पाटील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सर्व प्रकरणावर एक सूचक विधान केले आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा काही प्रस्ताव दिला तर स्वीकारणार का? असे विचारण्यात आले असता चंद्रकांत पाटील यांनी नक्कीच याचे भाजप स्वागत करेल, असं म्हटलं आहे. "आम्ही काही भजनी मंडळी नाही. आम्हीही एक राजकीय पक्ष आहोत. त्यामुळे असा काही प्रस्ताव आला तर त्यावर नक्कीच विचार केला जाईल. एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे अशापद्धतीचं कोणताही प्रस्ताव भाजपाकडे आला तर आम्ही नक्कीच त्याबाबत विचार करू", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे