शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Gram Panchayat Election Result: शिंदे गट-भाजपाने ३०० हून अधिक ग्रा. पंचायती जिंकल्या; फडणवीसांचा मोठा दावा, पहा जिल्ह्यानुसार आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 19:20 IST

Gram Panchayat Election Result Update: दोन जिल्ह्यांत भाजपाला घवघवीत यश, शिंदे गटाला एकाच जिल्ह्याने तारले... राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेला किती...

राज्यात झालेल्या ५४७ ग्राम पंचायतींमधील निवडणुकांचा आज निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपाने ३०० हून अधिक ग्रा. पंचायतींवर वर्चस्व स्थापित केल्याचा दावा केला आहे. हा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच जनतेने शिंदेंची शिवसेना आणि भाजपाच्या युतीला स्वीकारल्याचे ते म्हणाले. 

 आजच्या ग्रामपंचायतीच्या निकालांनी आमच्या शिवसेना भाजप युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. हा तुम्ही म्हणता तसा शिंदे गट नसून ही शिवसेना आहे. दुसरी जी आहे ती शिल्लक सेना आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असून ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी, हिंदुत्वावर चालणारी शिवसेना आहे. आजच्या निकालात साडे पाचशे पैकी ३०० हून अधिक जागांवर आम्ही जिंकलो आहोत. ही भविष्याची नांदी आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप यापुढे एकत्रित निवडुका लढवणार आहे. सगळीकडे आमचा विजय होताना तुम्हा सर्वांना दिसेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

यानंतर शिंदे यांनी ठाकरे गटाला त्यांचे अडीच वर्षांचे काम पाहून लोकांनी मत दिले, आम्हाला दोन महिन्यांचे काम पाहून मत दिले. यामुळे कोणाचा चांगले यश मिळाले हे तुम्हीच ठरवा, असा टोला लगावला. 

आतापर्यंत हाती आलेले निकाल...

  • नाशिकमध्ये एकूण 88 ग्रामपंचायतींपैकी 41 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले आहे. शिवसेनेने 13 तर भाजपा आणि काँग्रेसकडे प्रत्येकी पाच ग्रा. पं. गेल्या आहेत. माकप- 08 आणि शिंदे गटाकडे १ ग्रा. पंचायत गेली आहे. 
  • पुण्यात ६१ पैकी ३० ग्रा. पंचायती या राष्ट्रवादीकडे, सहा बिनविरोध झाल्या आहेत. भाजपाकडे ३, शिवसेना २, शिंदे गट ३ आणि स्थानिक आघाड्यांकडे २३ ग्रामपंचायती गेल्या आहेत.
  • यवतमाळमध्ये ७० पैकी ३३ ग्रा. पंचायती काँग्रेसकडे गेल्या आहेत. शिवसेना 3, भाजप 20, राष्ट्रवादी 09, मनसे 1 आणि स्थानिक आघाड्यांकडे 6 ग्राम पंचायती गेल्या आहेत. 
  • जळगाव जिल्ह्यात 13 पैकी शिवसेना, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला प्रत्येकी ३, अपक्षांना ४ आणि भाजपा, काँग्रेसला खातेही खोलता आलेले नाही. 
  • धुळे जिल्ह्यात भाजपाला ३३ ग्रा. पं. पैकी ३२ जागांवर भाजपा जिंकली आहे. एकच ग्रा. पं. राष्ट्रवादीला मिळाली आहे. 
  • अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी २०, भाजपा १६, आणि स्थानिक आघाड्यांना ९ ग्रा. पंचायती मिळाल्या आहेत. 
  • कोल्हापूरमध्ये एकाच ग्रा. पंचायतीची निवडणूक होती. यामध्ये मुश्रीफ गटाने बाजी मारली. 
  • नंदुरबारमध्ये ७५ पैकी ४२ ग्रा. पंचायतींवर भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिंदेगटाला २८, अपक्ष ४ आणि राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgram panchayatग्राम पंचायतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस