शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

Maharashtra Political Crisis: "उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील, तुम्ही सगळे परत या..." आमदार संतोष बांगर ढसाढसा रडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 12:40 IST

Eknath Shinde Revolt: मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा एक गट आधी सूरत व नंतर गुवाहटीत गेल्याने महाविकास आघाडीच्या सरकारवर संकटाचे ढग आहेत.

हिंगोली: मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा एक गट आधी सूरत व नंतर गुवाहटीत गेल्याने महाविकास आघाडीच्या सरकारवर संकटाचे ढग आहेत. या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मात्र शिवसेनेसोबतच राहणे पसंत केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेच नेतृत्व मान्य केले. मात्र या घडामोडी घडत असताना त्यांनी मुंबई सोडली नव्हती. 

'उद्धव साहेब माफ करतील'संतोष बांगर हे मुंबईहून शुक्रवारी सकाळी हिंगोलीत परतले. येथे त्यांचे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. यावेळी बंडखोर आमदारांना परतीचे आवाहन करताना त्यांना रडू कोसळले. "तुम्ही काही दिवसापासून बघत आहात, वातावरण अतिशय वाईट आहे. त्या सर्व आमदारांना माझी कळकळीची विनंती आहे. ज्यांनी-ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली, त्यांच्यावर पुन्हा गुलाल उधळला नाही. म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की, तुम्ही उद्धव ठाकरेंकडे या. साहेब शंभर टक्के तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाहीत."'भगवा आबाद ठेवा'"छत्रपती शिवरायांचा जो भगवा बाळासाहेबांनी आपल्या खांद्यावर दिलाय, तो आबाद ठेवण्याचे काम सर्वांनी करावं. हीच कळकळीची विनंती तुम्हाला करतो. मला आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांनाही विनंती करायची आहे, तुम्ही सगळे एकत्र या. तुम्ही जो निर्णय घ्याल, त्यात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. फक्त एकच काम करा, छत्रपतींच्या भगव्याला डाग लावू देऊ नका." 

'शिवसैनिक पक्षासोबतच आहे'ते पुढे म्हणाले की, "मी निवडून आल्यावर जेवढा सत्कार, सन्मान झाला नव्हता, तेवढा आज झाला. त्यामुळे आमदार कुठेही गेले तर शिवसैनिक ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे. अंगावरचा भगवा हटला तर आम्ही काहीच नाही. कितीही ऑफर आल्या तरीही बळी पडणार नाही. माझ्यासारखा किराणा दुकान चालविणारा माणूस आज आमदार झाला, हेच शिवसेनेच मोठेपण आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा हळव्या मनाचा माणूस आहे. ते वर्षा बंगला सोडत होते, तर लोक रडताना मी पाहिले. त्यामुळे या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे साकडे मी विठ्ठलाला घालत आहे", असेही ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाHingoliहिंगोलीUddhav Thackerayउद्धव ठाकरे