शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"स्वतःचे आमदार सांभाळता आले नाही, नाचता येईना अंगण वाकडे", सुधीर मुनगंटीवारांचा राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 19:51 IST

Maharashtra Political Crisis: 'दिल्लीच्या बापाच्या नावाने मत मागवून दाखवा', अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 50 आमदार घेऊन गेल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बंडखोर आमदारांवर टीका करताना, 'दिल्लीच्या बापाच्या नावाने मत मागवून दाखवा', अंस म्हणाले होते. या टीकेला आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी चोख उत्तर दिले आहे.

'आदित्य ठाकरेंसाठी कोणाला मत मागितले...'मीडियाशी संवाद साधताना मुनगंटीवार म्हणाले, "कुणी कुणाच्या बापाच्या नावाने मत मागितली, हे सगळ्यांना माहीत आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा नुवडणुकीत कोणाच्या नावाने मत मागितले, हे सर्वाना माहीत आहे. जनतेने कोणाला मते द्यायचे हा जनतेचा अधिकार आहे. संजय राऊत रोज खालच्या शब्दात बोलून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली नेण्याचे काम करत आहेत,'' अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.  

'तुमचे आमदार सांभाळता आले नाही'ते पुढे म्हणाले, "तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही आणि भाजपवर आरोप करत आहात. नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती शिवसेनेची आहे. तुमच्या अहंकाराला कंटाळून सेनेच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली, त्यात दोष भाजपला देण्याची गरज नाही. सरकार जात असताना आता यांना आता काश्मिरी पंडीत आठवले, स्वातंत्रवीर सावरकर आठवतील आता. अशा लोकांची बौध्दिकता तपासली पाहिजे," अशी खोचक टीकाही मुनगंटीवारांनी केली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना