शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात राडा! तानाजी सावंत समर्थनार्थ आंदोलन; शिवसैनिकाची गाडी फोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 12:38 IST

आता बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते पुढे आले आहेत.

बीड - राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण पेटलं आहे. एकीकडे शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३८ आमदार फुटले आहेत. तर बंडखोर आमदारांविरुद्ध शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. शनिवारी शिवसैनिकांनी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचं पुण्यातील कार्यालयावर तोडफोड केली. त्यानंतर तानाजी सावंत यांनी चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा केली. 

त्यानंतर आता बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते पुढे आले आहेत. पुण्यात ज्याठिकाणी सावंत यांच्या कार्यालयात तोडफोड केली. आज त्याठिकाणी काही कार्यकर्त्यांनी फुले वाहण्यात आली. तर दुसरीकडे बीड येथे तानाजी सावंत समर्थनार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एका शिवसैनिकाची गाडी फोडली. त्यामुळे आता दोन्ही बाजूने आक्रमक पवित्रा घेतल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे. 

बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा पुरवणार राज्यात शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाले असताना आता केंद्र सरकारने यात दखल घेतली आहे. केंद्राचे सीआरपीएफ जवान बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणार आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या आणि कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची असताना संरक्षण हटवण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी केला. त्यामुळे केंद्राने कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी बंडखोर आमदारांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. 

तानाजी सावंत यांनी दिला होता इशाराबंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा दिला होता. "एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल" असं म्हणत इशारा दिला. सावंत यांनी "आमचे गटनेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं" अशी फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे आता शिंदे गटही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेTanaji Sawantतानाजी सावंत