शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

‘अहंकार गेला तुका म्हणे देव झाला’; शिवसेनेच्या या अवस्थेला कोण जबाबदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 16:59 IST

विश्वासघाताने मिळवलेले एका राज्याचे मुख्यमंत्रीपद एवढे डोक्यात गेले की, नरेंद्र मोदी यांच्या सारख्या नेतृत्वाला ही आव्हान देण्याचा प्रयत्न होऊ लागला.

केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता भाजपा

शिवसेनेतील सध्या सुरू असलेला संघर्ष हा खर तर त्यांचा अतंर्गत प्रश्न आहे. पण एका इंग्रजी दैनिकात आलेल्या बातमीने लक्ष वेधले. या बातमीनुसार एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना ४५ फोन केले पण त्या आमदाराचा मुख्यमंत्र्याशी संवाद होऊ शकला नाही. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कोणाही कार्यकर्त्यांत्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे. या निमित्ताने सध्याच्या घडामोडी, या घडामोडींनंतर झालेले राजकीय नाट्य याकडे पाहताना शिवसेना नामक संघटनेचा गेल्या ५६ वर्षातला चढउताराचा आणि खाचखळग्याचा प्रवास डोळ्यासमोर येतो. काही वर्षे मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातही ज्या नावाची दहशत होती त्या दहशतीची, सामर्थ्याची अशी अवस्था का होते, हे कोणाचं प्राक्तन आहे याचा विचार करण्याची ही वेळ आहे. 

राजकीय अभीनिवेश बाजूला ठेवून या घडामोडींकडे पाहिले तर नेतृत्वाचा अहंकार एखाद्या संघटनेच्या अस्तित्वापुढे कसा प्रश्नचिन्ह उभा करतो याचा पट डोळ्यासमोर येतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती समाजातील एका विशिष्ट वर्गाला कधीच पसंद पडली नव्हती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी संघटनेच्या स्थापनेपासून मोजक्या आणि कर्तृत्ववान सहकाऱ्यांबरोबर विश्वासाचा बंध जपला होता. दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, मनोहर जोशी, लीलाधर डाके आदी सहकाऱ्यांशी नित्य विचार विनिमय करत बाळासाहेबांनी शिवसेनेची संघटनात्मक कार्यपद्धती रूढ केली. अनेक वर्षे बाळासाहेबांनी जपलेल्या या चौकटीला उद्धवरावांच्या कार्यकाळात तडा गेला. सामान्य सैनिकांच्या सुखदु:खात सहभागी होणारे बाळासाहेब, मीनाताई आणि आमदारासारख्या लोकप्रतिनिधींच्या दूरध्वनींना प्रतिसाद देण्याचे सौजन्यही न दाखवणारे उद्धवराव हा सेनेचा गेल्या २० वर्षातील उतरत्या भाजणीचा प्रवास आहे.

विश्वासू सहकाऱ्यांचे अष्टप्रधान मंडळ हे बाळासाहेबांच्या संघटनात्मक नीतीचे आदर्श उदाहरण होते. या विश्वासू सहकाऱ्यांशी विचार विनिमय करत शिवसेनेने स्थानीय लोकाधिकार समिती सारखी भूमिपुत्राच्या हक्कासाठी लढणारी संघटना उभी केली. मुंबई, ठाणे परिसरातील केंद्र, राज्य सरकारी सेवेत तसेच राष्ट्रीयकृत बँका, सरकारी महामंडळे, सरकारी कंपन्या यात मराठी माणसाचा बिनधोक प्रवेश होण्यासाठी लोकाधिकार समितीने सनदशीर मार्गाने लढे दिले.  मुंबईत वर्षानुवर्षे सेनेचा पाया मजबूत राहण्यासाठी लोकाधिकार समिती सारखे उपक्रमच कारणीभूत ठरले. 

उद्धवरावांकडे संघटनेची सूत्रे आल्यावर बाळासाहेबांच्या विश्वासू शिलेदारांना बाजूला काढण्याचा कार्यक्रम चालू झाला. ‘नवा गडी, नवे राज्य’ या न्यायाने उद्धवरावांनी आपला चमू निवडण्यास कोणाचीच हरकत नव्हती. मात्र, हे करताना बाळासाहेबांनी जपलेली विचार विमर्शाची कार्यपद्धती हेतूपूर्वक बाजूला सारली गेली. आपल्या नेतृत्वाला आव्हान मिळू नये या हेतूने सख्या चुलत आणि मावस भावालाही संघटनेत बेदखल केले गेले. संघटनेत एकछत्रीय अंमल निर्माण झाल्यावर कार्यपद्धतीत अहंकाराचा शिरकाव झाला. २००४ साली भास्कर जाधव या आमदाराला मातोश्रीत प्रवेश ही करू न देण्याचा उद्दामपणा प्रत्ययास येऊ लागला. तोपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक असलेले जाधव मातोश्रीच्या दरवाजा बाहेर कसे ढसाढसा रडले होते याची प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आठवण असेल. 

 ‘तुका म्हणे नरका घाली अभिमान, जरी होय अंगी गर्व ताठा, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला.’  या तुकारामाच्या ओवीनुसार अहंकाराचे वारे अनेकांच्या डोक्यात गेला. उद्धव रावांनी तर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनाही अनेकदा हेतुपूर्वक अवमानित केले. केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रिच्या नात्यामुळे आणि युती टिकवण्याच्या धोरणामुळे भाजपा नेतृत्वाने या घटनांना प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला नाही. बाळासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी विविध मार्गाने लढे देतानाच सामान्य माणसाच्या दैनंदिन प्रश्नांवरही मदतीस जाणारी सैनिकांची ‘शाखा’रूपी साधीसोपी कार्यपद्धती प्रत्यक्षात आणली. सामान्य माणसाने कोणत्याही अडचणी शिवसेनेच्या शाखेत घेऊन जाव्यात आणि त्याचे निराकरण करून घ्यावे, हा दंडकच बाळासाहेबांच्या काळात पडला होता. उद्धवरावांच्या कार्यकाळात संघटनावाढीसाठी कोणताही लोकोपयोगी उपक्रम हाती घेतला गेला तर नाहीच पण शाखांद्वारे जनतेचे प्रश्न सोडवण्याची हक्कांची जागाही हळूहळू निकालात काढली गेली. 

अल्बर्ट आइनस्टाइन असे म्हणाले आहेत की, “knowledge and ego are directly related, less the knowledge, greater the ego.” उद्धवरावांच्या कार्यपद्धतीत याचेच प्रत्यंतर गेले २० वर्षात अनेकदा आले. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्रजी फडणवीस यांनी निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, सेना नेतृत्वाने सत्तेच्या बळावर आपण अपक्ष आमदारांनाही वश करू या फाजील आत्मविश्वासापोटी फडणवीसांचा प्रस्ताव नाकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ही अवमान करणारी भाषा सेना नेतृत्व अहंकारापोटी वापरू लागले. विश्वासघाताने मिळवलेले एका राज्याचे मुख्यमंत्रीपद एवढे डोक्यात गेले की, नरेंद्र मोदी यांच्या सारख्या नेतृत्वाला ही आव्हान देण्याचा प्रयत्न होऊ लागला. या अहंकाराची परिणती राज्यसभा आणि विधान परिषद अशा लागोपाठच्या दोन पराभवात झाली. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत प्राधान्य क्रमाने येण्याच्या मत पद्धतीचा संबंध थेट बुद्धी चातुर्याशी आहे. अहंकारामुळे याचे ही विस्मरण झाले त्यामुळे, गाजावाजा करत उभा केलेला तिसरा उमेदवार पराभूत होताना पाहण्याची वेळ सत्तारूढ शिवसेनेवर आली. 

देवेंद्रजी नी, “move in the silence, only speak when it’s time to say checkmate” याचा प्रत्यय आणून दिला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रूचीस आले.’ सेनेतील सध्याच्या घडामोडी पाहता सेना नेतृत्व अहंकारामुळे बुद्धीचातुर्यास ही कसे पारखे झाले आहे, हेच ठसठशीतपणे दिसले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस