शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी २-३ दिवस आम्ही विरोधी पक्षात; नाराजीनाट्यात रावसाहेब दानवेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 14:01 IST

मुख्यमंत्री असताना २ वर्ष मंत्रालयात गेले नाहीत. आमदारांना भेटत नव्हते. निधी राष्ट्रवादीला मिळत होता असं दानवे म्हणाले.

जालना - आज मी केंद्रात मंत्री आहे, टोपे राज्यात मंत्री आहेत. मला अडीच वर्ष झाले तर टोपे यांना १४ वर्ष झाली. तुमच्या कारकिर्दीत आणखी काही कामे करायची असतील तर लवकर करून घ्या, वेळ निघून चालली आहे. आम्ही २-३ दिवस विरोधी पक्षात आहोत असं सूचक विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथील कार्यक्रमात बोलताना केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भाजपा पुन्हा सत्तेत येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

दानवे आणि टोपे यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयाच भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी दानवे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना एकत्र सामोरे गेले. जनतेने युतीला बहुमत दिले. प्रचारात मोदी-शाह व्यासपीठावर बोलले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील. तेव्हा शिवसेना आणि शिवसैनिक काहीही बोलले नाही. परंतु जेव्हा निकालानंतर आमच्याशिवाय सरकार बनत नाही असं लक्षात आल्यानंतर असंगाशी संगत केली. ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यासोबत सरकार बनवले. सरकार बनवल्यानंतरही चांगले चालवायला पाहिजे होते असं त्यांनी सांगितले. 

परंतु मुख्यमंत्री असताना २ वर्ष मंत्रालयात गेले नाहीत. आमदारांना भेटत नव्हते. निधी राष्ट्रवादीला मिळत होता, काँग्रेसला मिळत होता पण शिवसेनेच्या आमदारांना मिळत नव्हता ही त्यांची तक्रार आहे. राज्याच्या प्रश्नाकडे तिन्ही पक्षाच्या लोकांनी दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम शिवसेनेत असंतोष वाढला. आज शिवसेनेचे ४० आमदारांनी बंड केले. सरकार आम्ही पाडणार नाही असं आम्ही नेहमीच सांगितले. भाजपाचा याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहोत असंही रावसाहेब दानवे म्हणाले. 

शिंदे-फडणवीस यांची भेट नाही एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांची भेट झाली नाही. आमच्या बैठका सुरूच असतात. आम्ही बैठका घेतो, राज्याच्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. नाराज गटाने आमच्याकडे प्रस्ताव दिला नाही. प्रस्ताव आल्यास पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही असं सांगत रावसाहेब दानवेंनी अधिक भाष्य करणं टाळलं. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा