शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"मच्छर जरी चावला तरी तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठवला असं म्हणणारे ते लोक"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 18:18 IST

विधानं करून विचार करायला काय अर्थ आहे. तोडा महाविकास आघाडी, तुमची तत्वे, विचार वेगवेगळे आहेत असं बाळासाहेबांच्या शिवसेनेनं म्हटलं.

ठाणे - किसननगरमध्ये जे काही घडलं ते सगळ्यांनी पाहिले. योगेश जानकर यांच्या कार्यालयाबाहेर कोण गेले, कशासाठी गेले या सगळ्या माहितीये. राजन विचारे हे भयभीत झाले. त्यांना स्वप्नातही मुख्यमंत्री दिसतात. एखादा मच्छर जरी चावला तरी तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवला असं म्हणणारे हे लोक, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही अशा शब्दात बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं. 

नरेश म्हस्के म्हणाले की, ज्यावेळी योगेश जानकर यांच्या अंगावर मुलांना सोडलं. तेव्हा तेथील जमाव त्या मुलांच्या अंगावर गेला. तेव्हा खासदार राजन विचारे रिक्षात बसून पळून गेले. सगळ्यांकडे फुटेज आहे. त्यामुळे राजन विचारे काय बोलतात यावर आम्ही लक्ष देत नाही असं त्यांनी म्हटलं. 

राहुल गांधींबद्दल लोकांमध्ये रोषदेशाच्या स्वातंत्र्याकरिता ज्यांनी ज्यांनी बलिदान केले. विविध मतांचे विविध नेते आहेत. त्यामुळे एकाला चांगले बोलताना दुसऱ्याला वाईट बोलू नये. अनेक स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांची कामे त्यांच्यादृष्टीने महान आहेत. कुणीही कुणावर टीका करू नये या मताशी मी सहमत आहे. शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. राहुल गांधींनी जे म्हटलं त्यावर विरोध केला. विधानं करून विचार करायला काय अर्थ आहे. तोडा महाविकास आघाडी, तुमची तत्वे, विचार वेगवेगळे आहे. लोकांमध्ये राहुल गांधींबद्दल रोष आहे. त्यामुळे राहुल गांधींचे विधान अयोग्य आहे असं ते म्हणतात. 

तुमचे हात गेले कुठे?जेव्हा मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल विधान केले. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी स्वत: त्यांच्या प्रतिमेला जोड्याने हाणलं होते. मग आत्ताच्या नेत्यांचे हात गेले कुठे? का आंदोलन करत नाही. रस्त्यावर उतरत नाही. कदाचित शिल्लकसेनेकडे शिवसैनिक राहिला नाही. त्यामुळे ते रस्त्यावर उतरत नसतील. शिवसेनेने फक्त विधानं करून चालणार नाही. जी शिवसेना प्रत्येक गोष्टीवर रस्त्यावर उतरायची ती सेना कुठे आहे? शिवसेनेचे विरोध असता तर राहुल गांधींच्या पुतळ्याला जोड्याने हाणायला हवं होतं. केवळ दिखावा करण्याचं काम ठाकरे गट करतोय अशी टीका प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेRahul Gandhiराहुल गांधी