शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेतेपदही जाणार?; अंबादास दानवेंना हटविण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 08:55 IST

अर्थात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे त्याला मान्यता देतील का, याबाबत शंका आहे. 

मुंबई - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अंबादास दानवे यांच्याकडे असताना आता त्यांना पदावरून हटविण्याच्या हालचाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून आगामी विधिमंडळ अधिवेशनात केल्या जावू शकतात.शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह असे दोन्ही एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने विरोधी पक्षनेते दानवे हे आता सत्तापक्षाचा भाग झाले असल्याचे कारण देत त्यांना पदावर ठेवू नये, अशी भूमिका आता शिवसेनेकडून घेतली जावू शकते. तसे झाले तर दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येईल.

अर्थात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे त्याला मान्यता देतील का, याबाबत शंका आहे. विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादी काँग्रेस वा काँग्रेसकडे देण्याच्या हालचालीदेखील होऊ शकतात. ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे दानवे यांच्याकडेच विरोधी पक्षनेतेपद कायम राहावे, यासंदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादीकडून काय भूमिका घेतली जाते, हे महत्त्वाचे असेल.

पक्षीय बलाबलठाकरे यांच्याकडे विधान परिषदेत १२, राष्ट्रवादी व काँग्रेसकडे प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ९ जागा आणि राज्यपाल नियुक्त १२ जागा अद्याप रिक्त आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध ठाकरे यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली जाणार आहे. सर्वोच्च  न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली तर विरोधी पक्षनेते बदलण्याच्या हालचालींना ब्रेक लागेल.

खा. राऊत यांच्यावर कारवाईची मागणी

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मान्यता आणि धनुष्यबाण देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयात दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केल्यानंतर आता या संदर्भात आयोगाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राऊत यांच्या आरोपाबाबत निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी तसेच या आरोपाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयोगाकडे केली आहे. सोमय्या यांच्याशिवाय काही शिंदे समर्थकांनी आयोगाकडे वैयक्तिक पातळीवर तक्रारी केल्या असल्याचे समजते. आता आयोग या बाबत काय कार्यवाही करते याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे