शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 21:10 IST

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे चिडल्याचे पाहायला मिळाले.

Eknath Shinde on Uddhav Thackeray and Raj Thackeray: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूंकप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण ठरलं आहे ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याबाबत आजच्या दिवसभरात केलेली विधाने. एका मुलाखतीमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करण्याचा प्रस्ताव ठेवला. महाराष्ट्राच्या हितापुढे मी माझा इगो पाहत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याची चर्चा सुरु झालीय. यावर प्रतिक्रिया देताना मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिडल्याचे पाहायला मिळाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी निमंत्रण दिले. राज ठाकरेंच्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विविध राजकीय नेत्यांच्या या सगळ्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देणे टाळले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या दरे गावी आहेत. यावेळी पत्रकारांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे चिडल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी पत्रकाराला मागे सरकवत जाऊ दे यार, काय करता कामाचं बोला असं म्हटलं. 

दरम्यान, गुरुवारीच राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. यादरम्यान महापालिका निवडणुकांसाठी एकत्र राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी भेटीत महायुतीबद्दलची कुठलीही चर्चा नव्हती, ही केवळ सदिच्छा भेट होती. बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी मनमोकळेपणाने उजाळा दिला, असे म्हटलं होतं.

काय म्हणाले राज ठाकरे?

"मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही," असे राज ठाकरे म्हणाले.

त्यानंतर राज ठाकरेंच्या प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी "किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय," असे म्हटलं.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे